तहसील कार्यालयावर रोहेकरांची धडक! कुंडलिका नदी प्रदूषणावर प्रशासनाला जाब रोहा, दि. २८ (संदीप सरफळे) :- कुंडलिका नदीत सर्रासपणे गटारांचे सांडपाणी आणि रसायनमिश्रित घाण सोडली जात असल्याच्या संतापातून रोहेकरांनी आज तहसील कार्यालयावर धाड टाकत प्रशासनाला अक्षरशः जाब विचारला. कुंडलिका नदी बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन देत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिलीप वडके, रोहा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय देसाई, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरिवले, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, सुधीरकुमार यादव, ऊदय करडे, महेश बामुगडे, सुरेन्द्र निंबाळकर, प्रथमेश शिर्के, ॲड दिपक भगत, यज्ञेश भांड, उध्दव आव्हाड, सौ. अलेफिया रोहावाला आदी मान्यवर उपस्थित होते. “नदी वाचवायची की प्रदूषणाला मोकळे रान द्यायचे?” असा थेट सवाल करत नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शहरातील गटारांचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट कुंडलिका नदीत सोडले जात असल्याने नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार सूचना देऊनही नगरपरिषद आ...
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
भातसई नगरीत रंगणार भक्तीचा उत्सव! श्री महादाई देवी व श्री धावीर महाराज मूर्तींच्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन रोहा, दि. २३ (संदीप सरफळे) :- रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील आध्यात्मिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र भातसई येथे श्री महादाई देवी आणि धावीर महाराज मूर्तींच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येत्या मंगळवार, दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भातसई येथील श्री महादाई देवी व धावीर महाराज देवस्थान परिसरात हा सोहळा संपन्न होणार असून, यानिमित्ताने संपूर्ण गावात भक्तीमय वातावरणाची निर्मिती झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्धापन दिनानिमित्त अभिषेक, महापूजा आणि कीर्तन अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून देवाचे गुणगान गायले जाणार आहे. या मंगलमयी दिवसाची सुरुवात पहाटेच्या प्रसन्न प्रहरी होणार असून सकाळी ८.०० ते ९.०० या वेळेत काकड आरतीने सोहळ्याचा शुभारंभ होईल. त्यानंतर सकाळी ९.०० ते १०.०० या वेळेत मूर्तींना विधीवत अभिषेक घालण्यात येईल. सकाळी ११.०० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा मोठ्या उत्साहात सुरू होणार ...




Comments
Post a Comment