अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागातील जिल्ह्यांना अलर्ट मोडवर राहण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
सौरभ शिवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त वरसोली येथे नारळ फोडी स्पर्धेचे भव्य आयोजन अलिबाग-रायगड, दि. १३ (स्वप्निल नाईक) :- अलिबागचे माजी नगरसेवक संदीप शिवलकर यांचे सुपुत्र तथा शिवाज्ञा ट्रान्सपोर्टचे संचालक सौरभ शिवलकर (अलिबाग) यांच्या वाढदिवसानिमित्त नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून वरसोली येथे पारंपरिक नारळ फोडी स्पर्धेचे मोठ्या दिमाखात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला अलिबाग शहरासह परिसरातील विविध गावांमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. युवकांसह विविध वयोगटांतील स्पर्धकांनी सहभाग घेत स्पर्धेची रंगत अधिक वाढवली. नारळ फोडीच्या पारंपरिक खेळामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. स्पर्धेदरम्यान सहभागी स्पर्धकांनी जोशपूर्ण खेळ सादर करत उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नारळी पौर्णिमा हा कोकणातील सांस्कृतिक वारसा जपणारा महत्त्वाचा सण असून अशा उपक्रमांमुळे सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव अधिक दृढ होत असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले. सौरभ शिवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्पर्धेमुळे पारंपरिक खेळांना चालन...

Comments
Post a Comment