ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨
खोट्या बातम्या छापून व्यावसायिकाला व महिलेला ब्लॅकमेल करून वारंवार पैशाची मागणी

मंडणगड येथील व्यावसायिक विजय काते यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल


रायगड (प्रतिनिधी) :- रोहा तालुक्यातील निवी गावातील पत्रकार समीर रामा बामुगडे याने वारंवार खोट्या बातम्या छापून, ब्लॅकमेल करून, मंडणगड येथील व्यावसायिकाच्या फोटोला नकली पोलीस ड्रेस लावून व्हायरल करून, तसेच फोटो व व्हिडीयो तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार पैशाची मागणी केल्याप्रकरणी मंडणगड येथील व्यावसायिक विजय सिताराम काते यांनी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तसेच मंडणगड पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली असून तक्रारीची प्रत पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्याकडेही माहितीसाठी देण्यात आली आहे.
पत्रकारिता क्षेत्राला लोकशाहीचा चौथा स्तंभ असे म्हटले जाते. परंतु काही लुटारू पत्रकारांनी तर घाणेरड्या कृत्यांनी पत्रकारितेची व्याख्याच बदलविण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकार आपण नेहमीच ऐकत असतो. त्यामुळे असे पत्रकार म्हणजे "चौथा स्तंभ"च काय... पण "पोकळ बांबू" म्हणण्याच्या पण लायकीचे राहिलेले नाहीत, असे खेदाने म्हणावे लागत आहे.
रोहा तालुक्यातील निवी येथील समीर रामा बामुगडे याने मंडणगड येथील व्यावसायिक विजय सिताराम काते यांच्या फोटोला "मेन पोलीस फोटो सूट एडिटर" या मोबाईल पद्वारे नकली खाकी पोलीस ड्रेस लावून तो फोटो व्हायरल केला व त्या फोटोसह "नकली वनअधिकारी" अशा आशयाची खोटी व तथ्यहीन बातमी बातमी व्हायरल करून बदनामी केली.


तसेच, ही बदनामी थांबविण्याकरिता वारंवार पैशाची मागणी केली. अनेक वेळा गुगल पे वर पैसे घेतले, तर अनेक वेळा कॅश ने पैसे घेतले. २७ जून २०२५ रोजी तर त्याने १ लाख रूपयांची मागणी केली. त्यांपैकी २० हजार आधी घेतले व उर्वरित रक्कम घेण्यासाठी तो मंडणगड येथे आला व तेथे ८० हजार रूपये घेतले.

मोबाईल पद्वारे  कुणाच्याही फोटोला असा नकली पोलीस ड्रेस लावता येतो

त्यानंतर यापुढे मी अशा खोट्या बातम्या शहनिशा केल्याशिवाय छापणार नाही. "सदरच्या खोट्या बातम्या मी दापोली येथील विशाल मालवणकर आणि संजय गिरी गोसावी यांच्या सांगण्यावरून छापल्या आहेत" अशा प्रकारचा लेखी जबाब समीर बामुगडे याने मंडणगड पोलीस ठाणे येथे दिला आणि तो लेखी जबाब मंडणगड पोलीस ठाणे येथे दैनंदिन अहवालामध्ये नोंद करण्यात आलेला आहे. परंतु पुन्हा त्याने खोट्या बातम्या छापून बदनामी आणि फोटो व्हिडीयो व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशाची मागणी केल्यामुळे अखेर विजय काते यांनी याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाणे, आणि त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांच्याकडे तक्रार दाखल करून याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.

Comments

Popular posts from this blog