डिजीलॉकरचा वापर करून प्रमाणीकरण केलेले ओळखपत्र देण्याचा शुभारंभ


अलिबाग (प्रतिनिधी) :- रायगड पोलीस दलामार्फत राष्ट्रीय स्तरावर प्रथमच राष्ट्रीय स्तरावर प्रथमच डिजीलॉकरचा वापर करून प्रमाणीकरण केलेले ओळखपत्र देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. अशा प्रकारे ओळखपत्र देणारा रायगड जिल्हा पोलीस दल पहिले पोलीस दल आहे. 


हे ओळख पत्रसुरक्षित आणि कागद विरहीत असून तोतयेगिरी पासून सुरक्षित आहे. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे हे खातरजमा करण्यास अतिशय  सोपे आहे. तसेच तक्रारीच्या त्रासापासुन कायमची मुक्तता देणारेन्याय सारथी हॅलो AI ॲपचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधिक्षक आचल दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog