🚨 रायगड पोलीस शिपाई भरती : १५ मार्चला अलिबागमध्ये लेखी परीक्षा... 🚨 रायगड जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा नियमित; नागरिकांनी घाबरून जाऊ नये, साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी दोन सिलेंडर बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचे अंतर आवश्यक आहे – जिल्हाधिकारी किशन जावळे... 🚨

तळा शहरात ऑनलाईन लॉटरी, गेम च्या नावाखाली जुगाराचा धुमाकूळ; 
तातडीने कारवाई करण्याची मागणी

रोहा (प्रतिनिधी) :-
तळा शहरात ऑनलाईन लॉटरी आणि गेम्स च्या नावाखाली जुगाराचे चक्रव्यूह पसरलेले असून अनेक जुगारवेडे तरूण या चक्रव्यूहात गुरफटत चालले आहेत. येथील गेम्स आणि ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली चालू असलेल्या जुगाराविरूद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. याप्रकरणी कडक कारवाई करून हे ऑनलाईन लॉटरी आणि गेम्सच्या जुगाराचे धंदे कायमस्वरूपी बंद करावेत अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून व महिला वर्गाकडून केली जात आहे. या जुगारामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. तळा शहरात अशा प्रकारचे जुगाराचे अड्डे राजरोसपणे सुरू असून या ऑनलाईन लॉटरी आणि गेम्सच्या जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली आहे.
त्यामुळे भविष्यातील संभाव्य अनुचित प्रकार रोखण्यासाठी व कायदा-सुव्यवस्था कायम टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने तातडीने सदरच्या घातक धंद्यांवर उच्चस्तरिय कारवाई करून हे धंदे बंद करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Comments

Popular posts from this blog