सुक्ष्म व लघु उद्योजकांना जिल्हा पुरस्कार-२०२४ साठी अर्ज करण्याचे आवाहन

कावीर/अलिबाग (सुधिर भगत) :- सुक्ष्म व लघु उद्योजकानी सुयोग्य तंत्रज्ञानाची व नवीन उत्पादनाची निवड करावी आणि व्यवस्थापनातील दर्जा व त्यांच्या घटकाची निकोप वाढ व्हावी यासाठी सुक्ष्म व लघु उद्योजकांना प्ररित करण्याच्या उददेशाने जिल्हा पुरस्कार योजना महाराष्ट्र शासनाने १९८५ पासून कार्यान्वित केली आहे. सदर पुरस्कार प्रत्येक कैलेंडर वर्षामध्य पात्र सुक्ष्म व लघु उद्योग घटकांना देण्यात येतात. सुक्ष्म व लघु उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेण्याकरीता विहित नमुन्यात अर्ज महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, येथे  सादर करावा. असे आवाहन श्री. जी.एस. हरळय्या, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड अलिबाग यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत मोठ्या संख्येने उद्योजकांचे अर्ज प्राप्त होण्यासाठी वा योजनेबाबत प्रसिध्दी देण्यात येते. या व्यतिरिक्त जिल्हयातील सर्व औद्योगिक संघटनांना त्यांच्या सदस्य उद्योजकांनी अधिकाधिक संख्येने अर्ज करावे यासाठी आवाहन केले जाते. शासनाने निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करुन विजेत्या उद्योजकांची/ घटकाची निवड केली जाते. निवड करण्यात आलेल्य उद्योजकांना प्रथम पारितोषिक रु. १५०००/-, सन्मान चिन्ह तसेच व्दितीय पारितोषिक रु. 1००००/- सन्मान चिन्ह देण्यात येते.

अधिकाधिक सुक्ष्म व लघु उद्योजकांनी त्यांच्या तंत्रज्ञान, कार्यपध्दती, व्यवस्थापन कौशल्य, उत्पादकता आणि उत्पादनातील नाविन्य, संशोधन व विकास इत्यादीबाबत सुधारणा करावी यासाठी उद्योजकांना प्रेरित करण्याच्या हेतुने सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करुन विजेत्यांचा सत्कार करणे ही या योजनेमागील भूमिका आहे.

जिल्हा पुरस्कार योजनेचा लाभ घेणा-यांची पात्रता :-

ज्या घटकांनी यापुर्वी राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय व जिल्हा पुरस्कार मिळालेले आहेत असे घटक या पुरस्कारास पात्र होणार नाहीत.२. उद्योग संचालनालयाकडे कमीत कमी मागील ३ वर्षाच्या कालावधीमध्ये स्थायीरित्या सुक्ष्म उद्योग नोंदणी म्हणून नोंदणीकृत झाले असले पाहिजे. व लघु, ३. मागील २ वर्षात सलग उत्पादन करत असणारे घटक पात्र ठरतील.

अर्जदार वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.

वरीलप्रमाणे पात्रता असणा-या सुक्ष्म व लघु उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेण्याकरीता विहित नमुन्यात अर्ज सुक्ष्म व लघु उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेण्याकरीता विहित नमुन्यात अर्ज महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड बाजारासमोर, ठिकरुळ नाका, अलिबाग, जिल्हा रायगड, ईमेल आयडी didicraigad@gmail.com द्वारे सादर करावा. अधिक माहितीसाठी श्री. एस.एस. बिराजदार, व्यवस्थापक (संपर्क क्रमांक ८४८५८१०६५६) यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन श्री. जी.एस. हरळय्या, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड अलिबाग यांनी केले आहे. जिल्हा उद्योग केंद्र, रायगड बाजारासमोर, ठिकरुळ नाका, अलिबाग, जिल्हा रायगड, ईमेल आयडी didicraigad@gmail.com द्वारे सादर करावा. अधिक माहितीसाठी श्री. एस.एस. बिराजदार, व्यवस्थापक (संपर्क क्रमांक ८४८५८१०६५६) यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन सुक्ष्म व लघु उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेण्याकरीता विहित नमुन्यात अर्ज महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड बाजारासमोर, ठिकरुळ नाका, अलिबाग, जिल्हा रायगड, ईमेल आयडी didicraigad@gmail.com द्वारे सादर करावा. अधिक माहितीसाठी श्री. एस.एस. बिराजदार, व्यवस्थापक (संपर्क क्रमांक ८४८५८१०६५६) यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन श्री. जी.एस. हरळय्या, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड अलिबाग यांनी केले आहे. श्री. जी. एस. हरळय्या  यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog