डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने रोह्यात २६ टन कचरा स्वच्छ केला


रोहा (संदीप सरफळे) :- डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने रविवारी रोहे शहरात स्वच्छता अभियान राबविले. रोहा नगर पालिका मुख्याधिकारी अजयकुमार एडके आणि नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना सहकार्य केले.


यावेळी नगर पालिका हद्दीतील धावीर रोड, बायपास रोड, मुकुंद नगर, अष्टमी रोड, अंधार आळी रस्ता, रोहा अष्टमी रोड, रोहा कोलाड मुख्य रस्ता तसेच शहराला जोडणारे सर्व रस्त्यांची स्वछता करण्यात आली. या स्वछता अभियानात ४०० पेक्षा जास्त श्री सदस्यांनी सहभाग नोंदविला. स्वच्छता अभियान उपक्रमाला नगर पालिकेचे आरोग्य निरीक्षक मनोज पुळेकर, बांधकाम अभियंता सुधीर भगत, अधिकारी श्रीनिवास पाटील, नगरपालिका कर्मचारी, मयूर दिवेकर, बिलाल मोरबेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या अभियाना अंतर्गत शहरातील २६ टन कचरा गोळा करुन नगरपालिकेच्या डंपींग ग्राउंडमध्ये नेण्यात आला.

Popular posts from this blog