रोह्यातील पत्रकारावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची महिलेची मागणी
बातम्या छापू अशी धमकी देत महिलेकडून वारंवार पैशाची मागणी; गुगल पे वर घेतले पैसे
रायगड (प्रतिनिधी) :- बातम्या छापून बदनामी करण्याची धमकी देऊन महिलेकडून वारंवार पैशाची मागणी करणाऱ्य रोहा तालुक्यातील निवी येथील पत्रकार समीर रामा बामुगडे याच्या विरोधीत एका महिलेने पनवेल पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली असून सरच्या खंडणीबहाद्दर पत्रकाराच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सदरच्या महिलेने पनवेल पोलीस ठाण्यात केलेल्या तक्कारीद्वारे केली आहे.
पत्रकार असल्याची बतावणी करणारा रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील मौजे-निवी, येथे राहणारा समीर रामा बामुगडे हा गुंड प्रवृत्तीचा असून रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, रोहा, पाली येथील पोलीस स्टेशनला यापूर्वीच त्याच्याविरूध्द खंडणी व इतर गुन्हे दाखल झालेले आहेत. विशाल मालवणकर व संजय गिरी गोसावी यांच्या सांगण्यावरून समीर बामुगडे हा वारंवार खोट्या बातम्या छापून महिलेची बदनामी करत असून वारंवार पैसे मागत आहे. "जर तू मला पैसे दिले नाहीस तर तुझे फोटो आणि व्हिडीयो व्हायरल करून तुला तोंड दाखवायला जागा शिल्लक ठेवणार नाही." असे बोलून त्याने गुगल पे वर 60 हजार रूपये घेतले.
एवढे पैसे घेऊन देखील तो शांत बसलेला नसून वारंवार बातम्या छावून बदनामी करण्याची धमकी देऊन तो पैसे मागू लागला आहे. 27 जून रोजी त्या 1 लाख रूपयांची मागणी केली. त्यापैकी 20 हजार रूपये घेतवे व उर्वरित रक्कम घेण्यासाठी तो मंडणगड येथे आला तेथे 80 हजार रूपये घेऊन स्वतः व्हिडीयो प्रतिक्रीया पण दिली आहे की, सदरच्या खोट्या बातम्या मी विशाल मालवणकर व संजय गिरी यांच्या सांगण्यावरून छापलेल्या आहेत.
यापुढे मी तशा बातम्या छापणार नाही. तसेच तशा प्रकारचा लेखी जबाब देखील समीर बामुगडे याने मंडणगड पोलीस ठाणे येथे लेखी स्वरूपात दिलेला आहे. परंतु आता तो पुन्हा बातम्या छापण्याची धमकी देऊन पैशाची मागणी करू लागला असल्याचे सदर महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.