कोलाडमध्ये काही दिवस थंडावलेला मटका पुन्हा जोमात! कोलाड पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष; नागरिकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह? महिला वर्ग आक्रमक कोलाड-रायगड, दि. २९ (प्रतिनिधी) :- रोहा तालुक्यातील कोलाड परिसरात काही काळ बंद असलेला बेकायदेशीर मटका जुगार आता पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झाला असून मटका माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मध्यंतरीच्या काळात काही दिवस हा अवैध धंदा पूर्णपणे थंडावल्याचे चित्र होते; मात्र मटका चालकांनी आपले लागेबांधे वापरून हा गोरखधंदा पुन्हा जोमात सुरू केला असून स्थानिक पोलिसांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्टपणे समोर येत आहे. बंद पडलेला मटका जुगार अचानक पुन्हा कसा काय सुरू झाला, असा संतापजनक सवाल आता स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोलाड पोलीस ठाण्यात नव्याने पदभार सांभाळणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे यांचे संपूर्ण कायदा व सुव्यवस्थेवर कोणतेही नियंत्रण उरलेले नाही, हेच या वाढत्या अवैध अड्ड्यांवरून सिद्ध होत आहे....
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
शाळेतील गैरसोयींविरूद्ध आवाज उठविणाऱ्या पत्रकाराविरूद्ध विनयभंगाचा खोटा गुन्हा खारपाले पीएनपी हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेचा डाव पुन्हा एकदा फसला ...ही तर शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी मुख्याध्यापिका? ...अखेर सत्याचाच विजय! अलिबाग-रायगड, दि. ३१ (प्रतिनिधी) :- समाजाला सुसंस्कृत दिशा देणे, विद्यार्थ्यांना सत्य व नैतिकतेचे धडे शिकवणे आणि ज्ञानाचे मंदिर असलेल्या शाळेमध्ये पारदर्शकता जपणे हे एका शिक्षिकेचे व संस्थेच्या मुख्याध्यापिकेचे सर्वोच्च कर्तव्य असते. मात्र, याच पवित्र पदाचा गैरवापर करून स्वतःच्या शाळेतील गैरसोयी झाकण्यासाठी आणि त्याविरोधात वृत्तपत्रातून सातत्याने आवाज उठविणाऱ्या निर्भीड पत्रकाराचा आवाज दाबण्यासाठी विनयभंगासारख्या गंभीर कलमांचा हत्यारासारखा वापर करणाऱ्या पीएनपी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेचा डाव अखेर पूर्णपणे फसला आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, पेण यांनी संबंधित पत्रकाराची केलेली निर्दोष मुक्तता कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे योग्य ठरवत, त्या निकालाला आव्हान देणारे राज्य शासनाचे फौजदारी अपील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. अग्रवाल यांनी पूर्णपणे फे...




Comments
Post a Comment