रोहा येथे महिला पोलीसांनी केले विद्यार्थीनींचे समुपदेशन

  बदलापूर घटनेचे पडसाद  

रोहा (विशेष प्रतिनिधी) :- ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमधील शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. या शाळेच्या सुरक्षेमध्ये काही त्रुटी आढळून आल्या. घरापाठोपाठ मुलांसाठी सगळ्यात महत्त्वाची आणि विश्वासाची जागा त्यांची शाळा असते, मात्र तिथेच जर विकृत आणि राक्षसी वृत्तीचे नराधम या मुलांच्या आजूबाजूला वावरत असतील तर या छोट्या मुलामुलींचे समुपदेशन आवश्यक ठरते.

बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने रोहा पोलीसांनी तालुक्यातील प्रायमरी स्कूलना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महिला पोलीस हवालदार टेमकर, पेढवी, साळुंखे यांनी जे. एम.राठी स्कूल, मेहंदळे हायस्कूल, डॉ. गोविंद राजे स्कूल, रोहा पब्लिक स्कूल या शाळांच्या मुख्याध्यापकांना व शिक्षकांना बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, शाळेकडून मुलींना ने-आण करणाऱ्या स्कुलबस वर महिला अटेंडंटची नेमणूक करणे, लहान विद्यार्थीनींना वॉशरूम मध्ये नेण्याकरिता महिलांची नियुक्ती करणे, स्कूलमध्ये विद्यार्थीनींची काळजी घेण्याकरीता महिला-केअरटेकरच नेमण्यात यावी, तसेच मुलींना स्पर्शज्ञान जसे गूडटच, बॅडटच इत्यादी बाबत सुचना दिल्या. विद्यार्थीनींचे वर्ग भरवून समुपदेशन करण्यात आले.

Popular posts from this blog