रोहा तालुका व्हॉलीबॉल स्पर्धेत कोलाड हायस्कुलची बाजी 

वयोगट 14,17 व 19 मुलींमध्ये प्रथम, वयोगट 17 व 19 मुलांमध्ये प्रथम

रोहा (प्रतिनिधी) :- रोहा तालुका व्हॉलीबॉल स्पर्धा  द. ग. तटकरे माध्य. व उच्च माध्यमिक कोलाड हायस्कुलमध्ये शुक्रवारी 23 ऑगस्ट रोजी पार पडल्या. या शालेय पावसाळी स्पर्धामध्ये  द. ग. तटकरे माध्य. व उच्च माध्यमिक कोलाड हायस्कुलने वयोगट 14,17 व 19 मुलींमध्ये प्रथम, वयोगट 17 व 19 मुलांमध्ये प्रथम क्रमांक मिळवत आपली दरवर्षी विजेता होण्याची परंपरा कायम राखली. रोहा तालुका व्हॉलीबॉल  स्पर्धा क्रीडा अधिकारी राजेंद्र हातनूर, सचिन निकम व तालुका क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धामध्ये तालुक्यातील 15  शाळांनी आपला सहभाग नोंदवाला होता. तालुक्यातील सर्वच शाळांनी चित्तथरारक खेळ करत प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धेचे उद्घाटन आंबेवाडी सरपंच सुरेश महाबळे यांच्या हस्ते करण्यात आले. विजयी सर्व खेळाडूंना सुधागड एज्युकेशनच्या कार्यवाह सौ. गीताताई पालरेचा, उपाध्यक्ष रविंद्र लिमये, सेक्रेटरी रविकांत घोसाळकर, संचालक राजेंद्र पालवे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा आंबेवाडी सरपंच सुरेश महाबळे, द. ग. तटकरे माध्य व उच्च माध्यमिक हायस्कुल कोलाडचे मुख्याध्यापक सुखदेव तिरमले, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य बाळा महाबळे, रोहा तालुका क्रीडा समन्वयक रविंद्र कान्हेकर, शाळेचे पर्यवेक्षक व्ही. आर. थोरात, ज्युनियर कॉलेजचे प्रमुख डी. आर. पाटील, सौ. रेणुका धनावडे, पियुष सदावर्ते, बी. बी. काळे, एच. एस. काळे, निलेश बिरगावले, गोविंद कवलगे, दादासाहेब हाटे, धनंजय महाडिक, पंच सुशील शिंदे, प्राणिल करावडे, हर्षल मोकल, अलिंगर शेख, अविनाश सर, व्यवस्थापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोलाड विद्यालयाचे कर्तव्यदक्ष व कार्य तत्पर प्राचार्य सुखदेव तिरमले हे स्वतः मैदानात उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत होते.

अंतिम निकाल 

14 वर्षे मुलांमध्ये प्रथम क्रमांक एम. पी. एस. एस. कोलाड व द्वितीय क्रमांक द. ग. तटकरे माध्य. व उच्च माध्यमिक कोलाड हायस्कुल.

 14 वर्ष मुली प्रथम क्रमांक द. ग. तटकरे माध्य. व उच्च माध्यमिक कोलाड हायस्कुल, द्वितीय क्रमांक एम. पी. एस. एस. कोलाड.

17 वर्ष मुले प्रथम क्रमांक द. ग. तटकरे माध्य. व उच्च माध्यमिक कोलाड हायस्कुल, द्वितीय क्रमांक एम. पी. एस. एस. कोलाड.

17 वर्ष मुली प्रथम क्रमांक द. ग. तटकरे माध्य. व उच्च माध्यमिक कोलाड हायस्कुल, द्वितीय क्रमांक एम. पी. एस. एस. कोलाड.

19 वर्ष मुले प्रथम क्रमांक द. ग. तटकरे माध्य. व उच्च माध्यमिक कोलाड हायस्कुल , द्वितीय श्रीमती गीता द. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक वरसगांव. 

19 वर्ष मुली प्रथम क्रमांक द. ग. तटकरे कोलाड हायस्कुल, द्वितीय श्रीमती गीता द. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक वरसगांव.

Comments

Popular posts from this blog