🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

पंकज तांबे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

साई /माणगांव (हरेश मोरे) :- तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते पंकज तांबे यांचा वाढदिवस माणगांव तालुक्यातील अनेक शाळेत विविध उपक्रमानी 1 जुलै रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. माणगांव तालुक्यातील बामणोली, साई, मागवली, साले, जुने माणगांव उर्दू शाळा येथे पंकज तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप करण्यात आला.

तसेच विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य वाटप व झाडे वाटप, महिला बचत गटसाठी शिलाई मशीन वाटप करण्यात आले.अनेक वर्षांपासून शैक्षणिक व समाज हिताचे कामात अग्रेसर असतात. माणगांव तालुक्यातील गोरगरीब शेतकरी यांच्या साठी नेहमी उपयोगी पडणारे पंकज तांबे यांचे ऋणानुबंधन समाजात कायमचे स्मृतीत राहणार आहेत.

 यावेळी साई येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग मोरे, बामणोली ग्रामपंचायत सरपंच सुवर्णा सकपाळ, माजी सरपंच माधुरी वाढवल, माजी उपसरपंच प्रविण पाखुर्डे, स्वप्निल शिर्के, देवेंद्र राऊत, मुकुंद वाढवल, सावित्रीबाई महिला बचत गट मागवली व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog