सद् भावना सेवा प्रतिष्ठान दादर यांच्या वतीने रा.जि.प. शाळा नांदवी यांस संगणक व विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप


साई/माणगांव (हरेश मोरे) :- सामान्यपणे मानवतेच्या कल्याणासाठी स्थापन केलेली व त्याकरिता खाजगी धनाचा उपयोग करणारी संस्था म्हणजे प्रतिष्ठान होय. अखिल जगातील मानवजातीची सुस्थिती उंचावण्याचा प्रयत्‍न करणे हा प्रतिष्ठानाचा उद्देश असतो.अशातच सर्वांचं हित जाणून घेणारे प्रतिष्ठान अर्थात सद् भावनासेवा प्रतिष्ठान दादर हे गेले सात-आठ वर्ष सातत्याने जनसेवा करत आहेत. प्राथमिक शिक्षण घेत असताना मुलांना संगणकीय ज्ञान मिळावे या उद्देशाने नांदवी येथील रायगड जिल्हा परिषद शाळेला सद् भावनासेवा प्रतिष्ठानच्या वतीने पदाधिकारी यांच्या हस्ते संगणक व विद्यार्थ्यांना शाळेय उपयोगी वस्तू देण्यात आल्या.तसेच इयत्ता पाचवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांना कंपास बॉक्स  देण्यात आले .

सद् भावनासेवा प्रतिष्ठाचे मुख्य पदाधिकारी. अमित सावंत, सुशील वावेलकर, विलास नाईक, प्रशांत राणे यांचे स्वागत शाळा कमिटीचे अध्यक्षा प्रभा निवळे तसेच रा. जि.प शाळेचे मुख्य शिक्षक  संदीप जंगम, संदीप पुरारकर कविता जंगम मॅडम तसेच उपस्थित ग्रामस्थ व सर्व समाजसेवक यांच्यावतीने करण्यात आले. 

प्रामुख्याने समाजसेवक आदेश सावंत, सागर सावंत, राज सावंत, अक्षय सावंत या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक संदीप जंगम यांनी पाहिले. अखेर सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.

Comments

Popular posts from this blog