वृक्षारोपण व वह्या वाटपाने शेखर गोळे यांनी साजरा केला वाढदिवस

नागोठणे : महेंद्र माने) :- येथील भाजपा  क्रीडा तालुका संयोजक शेखर गोळे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवार 21 जुन रोजी वृक्षारोपण व जि. प. च्या शाळेत वह्यांचे वाटप करून वाढदिवस साजरा केला.

शेखर गोळे यांनी भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य मारुती देवरे, शिक्षण सेल तालुका अध्यक्ष अशोक अहिरे, उपतालुकाध्यक्ष धनराज उमाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रामनगर येथील साई मंदिर परिसरात वृक्षारोपण तसेच भाजपा रोहा तालुका सरचिटणीस आनंद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदच्या कचेरी शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी शामकांत नेरपगार, तीरथ पोलसानी, लिलाधर तुरे, अंकुश सुटे, गणेश घाग, चंद्रकांत मोरे, अक्षय सुटे आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog