पनवेल, नवी मुंबईत ऑर्केस्ट्रा बार च्या नावाखाली सुपर लेडीज डान्स बार? 

सुपरहिरोंची सुपर पॉवर फिकी पडली का? - ॲड. काशिनाथ ठाकूर 

रायगड (विशेष प्रतिनिधी) :- "महाराष्ट्राचे सुपरहिरो" अशी पोलीसांची स्तुती करणारे बॅनर सध्या सोशल मिडीयावर झळकताना दिसू लागले आहेत. परंतु पनवेल, नवी मुंबई परिसरातील अवैध धंदे आणि ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली लेडीज डान्स बार चालवले जात आहेत. त्यामुळे "बाहेर किर्तन आणि आतमध्ये तमाशा" अशी परिस्थिती येथे दिसू लागली आहे! लेडीज डान्सबार विरूद्ध कारवाई करताना या सुपरहिरोंची सुपर पॉवर फिकी पडते का? असा संतप्त सवाल प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. 

पनवेल, नवी मुंबई परिसरातील ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली सुरू असलेल्या लेडीज डान्सबारमध्ये चालत असलेला धांगडधिंगा हा सध्या फक्त महाराष्ट्रातच नव्हे; तर देशभरात गाजत असल्याचे दिसत आहे. या परिसरात तर अनेक लेडीज डान्सबार मध्ये रात्री उशीरापर्यंत अश्लील व समाजविघातक प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आलेले असून येथील आर्केस्ट्रा बारच्या नावाखाली सुरू असलेल्या लेडीज डान्सबारमध्ये अल्पवयीन बांग्लादेशीय मुलींचा धुडगूस सुरू असल्याचे दिसत आहे. या परिसरात अनेक लेडीज डान्सबारमध्ये अल्पवयीन बांग्लादेशीय मुलींचा धुडगूस सुरू असल्याचे दिसून आलेले असून येथील पोलीसांना कारवाई करण्याचा अधिकार असून देखील वरिष्ठांना नाराज न करण्यासाठी कारवाई करीत नसल्याचे दिसत आहे. अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर यांनी वारंवार उच्चस्तरिय तक्रारी दाखल केलेल्या असून नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली सुरू असलेल्या लेडीज डान्स बारवर सातत्याने कारवाईची "स्टंटबाजी" सुरू असली, तरी तरी प्रत्यक्षात मात्र कोणतीही कारवाई केली जात नसल्यामुळे अनेक बारमध्ये अटी शर्तींचा सर्रासपणे भंग होताना दिसत आहे. या परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजण्याच्या मार्गावर आल्याने या परिसरात पोलीस जिवंत आहेत का? असा प्रश्न ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

Comments

Popular posts from this blog