🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

उसरोली येथे आयेशा क्लिनिकचे उद्घाटन

तळा (नजीर पठाण) :- मुरूड तालुक्यातील उसरोली येथे अन्जुंमान शाळेजवळ आयशा क्लिनिकचे उद्घाटन प्रसिध्द डाॅ. मकबूल कोकाटे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. यावेळी डॉ. प्रविण जैन, डॉ. संजय पाटील, डॉ. सुलतान हसवारे, अब्दुल हमीद हलडे, मोबीन गलटे, रशीद गलटे, सलीम नाकवाजी, अहमद लोखंडे, मुस्ताक गलटे, नासीर गलटे यांसह इतर मान्यवर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डाॅ. आयेशा किरकीरे घलटे यांच्या क्लिनिकनेउसरोली पंचक्रोशीतील गोरगरिब पेशंटना नागरिकांना याचा फायदा होईल व चांगली वैद्यकीय सुविधा मिळेल. कोणताही डाॅक्टर हा आपली सेवा करीत असताना काळजी घेत असतो वेळीच आजाराचे निदान करून उपचार करीत असतो. मात्र आजाराचे तीव्रता अधीक होत असेल परिस्थिती पाहून नंतरच पुढील उपचारासाठी दुसऱ्या डाॅक्टरकडे रिफर करतो. डाॅ. आयेशा यांनी योग्य निर्णय घेऊन ग्रामीण भागातील माणसांची आरोग्य सेवा देण्याचा संकल्प केला आहे. डाॅ. आयेशा यांच्या उपक्रमातून भावी डाॅक्टरांनी बोध घ्यावा असे आवाहन डॉ. कोकाटे यांनी उद्घाटन प्रसंगी केले.

Comments

Popular posts from this blog