पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा काशिद समुद्रात बुडून मृत्यू


मुरुड :-  तालुयातील काशिद समुद्रात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. हा तरुण मुंबई-लोअर परेल येथून आपल्या मित्रांसोबत फिरायला आला होता. पोहायला उतरला असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली.मुंबई लोअर परेल येथे राहणार्या दहा जण काशिद समुद्रकिनारी फिरावयास आले होते. त्यांतील काही जणांची समुद्रात पोहण्याची इच्छा झाली. ते नवीन जेट्टी विकसित होत असलेल्या भागात पोहण्यासाठी समुद्रात उतरले. परंतु, ऋषभ दास (वय १७) याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.

त्याला शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले, परंतु काही तासानंतर तो सापडला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु, डॉटरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

Comments

Popular posts from this blog