तेलंगणा राज्यातील मालमत्तेविरूद्ध दाखल गुन्ह्यातील आरोपींना माणगांव पोलीसांनी केले गजाआड

माणगांव (दिपक दपके) :- पहाडीशारीफ पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. 282/2024 भा.द.वि. कलम 392 प्रमाणे दिनांक 24 मे 2024 रोजी 05.50 वा च्या सुमारास मौजे मनकलगाव ता. महेश्वरम जि. रचिकोंडा राज्य  तेलंगणा येथे घडला असून दिनांक 24 मे 2024 रोजी 08.00 वा च्या सुमारास वरील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.  सदर गुन्ह्यातील फिर्यादी श्रीमती गडडमेडी कल्पना महेंदर हे मॉर्निंग वॉक करिता गेले असता त्याचे गळ्यातील सोन्याची चैन आरोपीतांनी जबरदस्तीने हिसकावून चोरून नेली अशा प्रकारची त्यांनी दिलेल्या तक्रारी वरून सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपित नामे 1) धनला बाबू बालाजी गायकवाड रा. मुबाराक नगर, निजामाबाद मूळ रा. खारपूर ता. देगलूर जि. नांदेड 2) समशेर सिंग चतुरसिंग टाक रा. बिचुकुंडा निजामाबाद राज्य तेलंगणा हे सदर गुन्ह्या घडल्यापासून आपले अस्तित्व लपून इतर राज्यामध्ये फिरत होते त्याचेंवर तेलंगणा राज्यात मालमत्तेविरोधीचे चे (चोरी, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी) एकूण 37 गुन्हे दाखल करण्यात आले बाबत संबधीत पोलीस ठाणे कडून माहिती प्राप्त झाली होती.  सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल झेंडे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. पुष्कराज सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक, माणगाव पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली पोलीस ठाणे स्तरावर शोध  पथके तयार करण्यात आली होती. त्याप्रमाणे प्राप्त माहितीच्या अनुषंगाने हद्दीत गस्त वाढविण्यात आली होती. त्यावरून नमूद गंभीर गुन्ह्यातील आरोपीत हे माणगाव रेल्वे स्टेशन येथे येणार असल्याची  गोपनीय माहिती बातमीदारा मार्फत मिळाल्याने सदर ठिकाणी माणगाव पोलीस स्टेशनच्या तपास पथकांनी सापळा रचून आरोपीत यांचा फिल्मी स्टाईल ने पाठलाग करुन आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता संबंधीत आरोपीत यांनी चोरी, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे अनेक गुन्हे केल्याबाबतची कबुली दिल्याने सदर आरोपीत यांना पहाडीशारीफ पोलीस ठाणे जि. रचिकोंडा राज्य  तेलंगणा कडील तपासिक अधिकारी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
         सदरची कामगिरी श्री सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक रायगड, श्री अंतुल झेंडे अपर पोलीस अधीक्षक रायगड यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. पुष्कराज सूर्यवंशी, यांचे अधिपत्याखाली माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील, पोलीस उपनिरीक्षक किर्तीकुमार गायकवाड, पोहवा/ रावसाहेब कोळेकर, पोशि/डोइफोडे, पोशि/माटे, पोशि/पाटील, पोशि/बोरकर, पोशि/पवार यांनी पार पाडली आहे.

Comments

Popular posts from this blog