प्राचार्य डॉ. विश्वास देशमुख यांना यावर्षीचा महाराष्ट्र गुणवंत शिक्षक सन्मान प्रदान रोहा : किरण मोरे कोलाड येथील तटकरे चॅरिटेबल ट्रस्ट संचालित डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोवे कोलाडचे प्राचार्य डॉ. विश्वास देशमुख यांना नेहरू युवा केंद्र पणजी-गोवा (सरकार) व किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील महाराष्ट्र गुणवंत शिक्षक सन्मान दि. ०९ जुलै २०२३ रोजी श्री. सुभाष फळदेसाई (मजूर व पुराभिलेख मंत्री, गोवा राज्य ), डॉ. चंद्रकांत शेटये (आमदार, गोवा राज्य), श्री. सगुण वेळीप (संचालक, कला व संस्कृती संचानालय, गोवा) श्री. कालिदास घाटवळ (उपसंचालक, नेहरू युवा केंद्र, पणजी भारत सरकार), माजी केंद्रीय मंत्री श्री. रमाकांत खलप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. प्राचार्य डॉ. विश्वास देशमुख हे गेली १६ वर्षाहून अधिक काळ अध्यापनाचे कार्य करतात. त्यांच्या अध्यापनाचा मुख्य विषय अर्थशास्त्र आहे. अर्थशास्त्र विषयात त्यांनी पुणे विद्यापीठातून पीएचडी
Popular posts from this blog
रोहा येथील शिक्षक सहकारी पतपेढी डुबण्याच्या मार्गावर? संस्था दिवाळखोरीत निघण्याची शक्यता करोडो रूपयांची थकबाकी.! रोहा : विशेष प्रतिनिधी कमी व्याजदाराने कर्ज देणारी संस्था म्हणून गेली ४७ वर्षे अविरत सेवा देणाऱ्या रोहा येथील प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीने उपविधी आणि नियमांचे काटेकोरपणे पालन केले नसल्याने या वर्षी ही संस्था तोट्यात जात असल्याचे जिल्हा विशेष लेखा परिक्षक (वर्ग १) सहकारी संस्था चौकशी अहवालात स्पष्ट झाले असून, ही संस्था दिवाळखोरीत निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २०२२-२३ च्या आर्थिक जमाखर्च पत्रकात संस्थेने उपविधी आणि नियमांचे पालन न केल्यामुळे जिल्हा उपनिबंधक जिल्हा सहकारी संस्था रायगड यांच्याकडे सभासदांनी तक्रार दाखल केली आहे. याविषयी गंभीर दखल घेत लवकरच मा. उपनिबंधक संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापक याशिवाय तक्रारकर्ते यांची एकत्रित सुनावणी आपल्या कार्यालयात ठेवणार आहेत. तसेच त्यांनी विशेष लेखा परीक्षणासाठी विशेष अधिकारी नियुक्त करण्याचे सुतोवाच देखील केले. सादर केलेल्या अहवालानुसार संस्थेच्या सभासदाकडून ३१ मार्च २०२३ पूर्वी वसूल न झालेले व्याज व मुद्दल करो