रोह्यातील पत्रकारावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची महिलेची मागणी बातम्या छापू अशी धमकी देत महिलेकडून वारंवार पैशाची मागणी; गुगल पे वर घेतले पैसे रायगड (प्रतिनिधी) :- बातम्या छापून बदनामी करण्याची धमकी देऊन महिलेकडून वारंवार पैशाची मागणी करणाऱ्य रोहा तालुक्यातील निवी येथील पत्रकार समीर रामा बामुगडे याच्या विरोधीत एका महिलेने पनवेल पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली असून सरच्या खंडणीबहाद्दर पत्रकाराच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सदरच्या महिलेने पनवेल पोलीस ठाण्यात केलेल्या तक्कारीद्वारे केली आहे. पत्रकार असल्याची बतावणी करणारा रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील मौजे-निवी, येथे राहणारा समीर रामा बामुगडे हा गुंड प्रवृत्तीचा असून रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, रोहा, पाली येथील पोलीस स्टेशनला यापूर्वीच त्याच्याविरूध्द खंडणी व इतर गुन्हे दाखल झालेले आहेत. विशाल मालवणकर व संजय गिरी गोसावी यांच्या सांगण्यावरून समीर बामुगडे हा वारंवार खोट्या बातम्या छापून महिलेची बदनामी करत असून वारंवार पैसे मागत आहे. "जर तू मला पैसे दिले नाहीस तर तुझे फोटो आणि व्हिडीयो व्हायरल करून तुला तोंड ...
Popular posts from this blog
गोवंश हत्या करणाऱ्यांवर कडक कारवाई करा! माणगांव तालुका सकल हिंदू समाजाचे माणगांव तहसीलदारांना निवेदन माणगांव (प्रमोद जाधव) :- माणगांव तालुक्यासह रायगड जिल्ह्यात वाढत असलेले गोवंश हत्येचे प्रकार, गोवंश मांस वाहतूक व बेकादेशीररित्या विक्री यावर पूर्ण:त कडक निर्बंध लाऊन असे प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. महाराष्ट्र राज्याच्या गृह खात्याने याकडे विशेष लक्ष केंद्रित करावे. यासाठी माणगांव तालुका गो रक्षा गोसंवर्धन समितीचे अध्यक्ष तथा जनसेवा संघटना माणगांव चे संस्थापक अध्यक्ष ॲड. अनिकेत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव तालुक्यातील विविध हिंदू संघटना व गोवंशप्रेमी संघटना यांच्या माध्यमातून १९ जून रोजी माणगाव तहसीलदार विकास गारूडकर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात रायगड जिल्ह्यात गोवंश हत्येचे प्रमाण गेल्या वर्षभरापासून वाढत चाललेले आहे. गोवंशाची दिवसाढवळ्या कत्तल करीत आहे. पोलीस प्रशासनाला त्याविषयी पूर्व कल्पना, माहिती देऊनसुद्धा हत्या रोखण्यात अपयशी ठरत आहे. दिनांक १८ जून रोजी महाड जवळील इसाने कांबळे येथे गोरक्षक आणि आणि पोलीस प्रशासन यांच्यावर जमावाने हल्ला केला. त्य...
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने रोह्यात २६ टन कचरा स्वच्छ केला रोहा (संदीप सरफळे) :- डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने रविवारी रोहे शहरात स्वच्छता अभियान राबविले. रोहा नगर पालिका मुख्याधिकारी अजयकुमार एडके आणि नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना सहकार्य केले. यावेळी नगर पालिका हद्दीतील धावीर रोड, बायपास रोड, मुकुंद नगर, अष्टमी रोड, अंधार आळी रस्ता, रोहा अष्टमी रोड, रोहा कोलाड मुख्य रस्ता तसेच शहराला जोडणारे सर्व रस्त्यांची स्वछता करण्यात आली. या स्वछता अभियानात ४०० पेक्षा जास्त श्री सदस्यांनी सहभाग नोंदविला. स्वच्छता अभियान उपक्रमाला नगर पालिकेचे आरोग्य निरीक्षक मनोज पुळेकर, बांधकाम अभियंता सुधीर भगत, अधिकारी श्रीनिवास पाटील, नगरपालिका कर्मचारी, मयूर दिवेकर, बिलाल मोरबेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या अभियाना अंतर्गत शहरातील २६ टन कचरा गोळा करुन नगरपालिकेच्या डंपींग ग्राउंडमध्ये नेण्यात आला.




Comments
Post a Comment