रोह्याची कन्या अनुष्का देशपांडे हिची एमबीबीएस परीक्षेत यशस्वी वाटचाल आजोबांचे स्वप्न साकार रोहा-रायगड, दि. १३ (संदीप सरफळे) :- कोणतेही मोठे ध्येय साध्य करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांची जोड असेल, तर यशाचे शिखर सहज गाठता येते, याचाच प्रत्यय रोह्यातील एका कन्येने आणून दिला आहे. रोहा परिसरातील अत्यंत हुशार आणि कष्टाळू विद्यार्थिनी डॉ. अनुष्का हेमांगी पुरुषोत्तम देशपांडे हिने वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च मानली जाणारी 'एमबीबीएस' ही पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. तिच्या या घवघवीत यशामुळे केवळ तिच्या कुटुंबाचीच नव्हे, तर तिला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे आणि संपूर्ण रोहा परिसराचे नाव शिक्षण क्षेत्रात मोठ्या अभिमानाने उज्ज्वल केले आहे. अनुष्काचा हा शैक्षणिक प्रवास सुरुवातीपासूनच अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी राहिला आहे. तिने आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण म्हणजेच नर्सरी ते दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम रोह्यातील नामांकित एम. बी. पाटील इंग्लिश स्कूलमधून पूर्ण केला. शालेय जीवनात असल्यापासूनच तिने आपल्या अभ्यासातील कमालीचे सातत्य आणि उत्कृष्ट गुणवत्तेची छाप शिक्...
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
उत्तर मुंबई महिला काँग्रेसच्या महासचिव पदी पूनम शिंदे यांची नियुक्ती पक्षाकडून संघटनात्मक जबाबदाऱ्या जाहीर बोरीवली-मुंबई, दि. २० (प्रतिनिधी) :- संभाजी ब्रिगेडच्या उत्तर मुंबई जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पूनम शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मुंबई येथील राजीव गांधी भवन येथे आयोजित एका महत्त्वपूर्ण बैठकीत हा पक्षप्रवेश सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या बैठकीला मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ॲड. तुलीप मिरांडा आणि उत्तर मुंबई जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रगती राणे प्रामुख्याने उपस्थित होत्या. त्यांच्याच उपस्थितीत पूनम शिंदे यांच्यासह नंदा तळवटकर, गायत्री टपाल, सुरेखा अलमवार, सुरेखा सब्बन यांच्यासह सुमारे १५ हून अधिक महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला. या सर्व महिलांचे पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी स्वागत करत त्यांच्या पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा केली. या जाहीर पक्षप्रवेशानंतर काँग्रेस पक्ष बळकटीकरणासाठी तातडीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या संघटनात्मक जबाबदाऱ्याही जा...




Comments
Post a Comment