सौरभ शिवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त वरसोली येथे नारळ फोडी स्पर्धेचे भव्य आयोजन अलिबाग-रायगड, दि. १३ (स्वप्निल नाईक) :- अलिबागचे माजी नगरसेवक संदीप शिवलकर यांचे सुपुत्र तथा शिवाज्ञा ट्रान्सपोर्टचे संचालक सौरभ शिवलकर (अलिबाग) यांच्या वाढदिवसानिमित्त नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून वरसोली येथे पारंपरिक नारळ फोडी स्पर्धेचे मोठ्या दिमाखात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला अलिबाग शहरासह परिसरातील विविध गावांमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. युवकांसह विविध वयोगटांतील स्पर्धकांनी सहभाग घेत स्पर्धेची रंगत अधिक वाढवली. नारळ फोडीच्या पारंपरिक खेळामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. स्पर्धेदरम्यान सहभागी स्पर्धकांनी जोशपूर्ण खेळ सादर करत उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नारळी पौर्णिमा हा कोकणातील सांस्कृतिक वारसा जपणारा महत्त्वाचा सण असून अशा उपक्रमांमुळे सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव अधिक दृढ होत असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले. सौरभ शिवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्पर्धेमुळे पारंपरिक खेळांना चालन...
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
नागोठण्याजवळ बोरावाडी येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात संपन्न पारंपरिक वेशभूषा, तारपा नृत्य आणि भव्य रॅलीतून घडले संस्कृतीचे दर्शन शिहू-रायगड, दि. ९ (मंजुळा म्हात्रे) :- दरवर्षी ९ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण जगभरात 'जागतिक आदिवासी दिन' म्हणून अतिशय उत्साहात आणि आदराने साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राच्या महत्त्वपूर्ण ठरावानुसार जगभरातील आदिवासी समाजाचे हक्क, त्यांची आगळीवेगळी संस्कृती, परंपरा आणि त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने हा दिवस विशेष पाळला जातो. संयुक्त राष्ट्र महासभेने डिसेंबर १९९४ मध्ये अधिकृत ठराव संमत करून ९ ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन म्हणून जाहीर केला होता. तत्पूर्वी, ९ ऑगस्ट १९८२ रोजी जिनेव्हा येथे युनायटेड नेशन्सच्या मानवी हक्क आयोगाच्या स्वदेशी लोकसंख्याविषयक कार्यगटाची पहिली ऐतिहासिक बैठक पार पडली होती, ज्याची आठवण म्हणून हा दिन जगभरात ओळखला जातो. आदिवासी समुदायाच्या जमिनी, भाषा आणि मानवी हक्कांचे सक्षमपणे रक्षण करणे, त्यांच्या पारंपरिक कला, बोलीभाषा आणि जीवनशैलीचा सन्मान करणे, तसेच जल, जंगल आणि जमीन या निसर्गसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी आ...
सामाजिक बांधिलकी आणि निर्भीड पत्रकारितेचा वसा जपणारे 'देश विदेश टाईम्स'चे संपादक सचिन साळुंखे शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचाराची पोलखोल; मुजोर अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराला चाप सत्य आणि निष्ठेची नवी ओळख रोहा (विशेष प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेचे पावित्र्य जपत, सामान्य जनतेच्या हक्कासाठी सतत रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे 'देश विदेश टाईम्स'चे मुख्य संपादक सचिन रजनी वामन साळुंखे यांचे कार्य सध्या संपूर्ण रायगड जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरत आहे. प्रशासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि कष्टकऱ्यांची होणारी अडवणूक रोखण्यापासून ते थेट अन्यायाला वाचा फोडण्यापर्यंत त्यांनी नेहमीच आक्रमक व अभ्यासू भूमिका घेतली आहे. अनेक सरकारी कार्यालयांत न्याय मागण्यासाठी जाणाऱ्या गोरगरीब जनतेला काही मुजोर अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून नाहक त्रास दिला जातो, अशा अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराची पोलखोल करत त्यांना कायद्याची योग्य जागा दाखवून देण्याचे आणि सर्वसामान्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचे धाडस सचिन साळुंखे यांन...
धाटाव येथील 'बेक' कंपनीत कामगारांना भरघोस पगारवाढ कामगार नेते संजयजी वढावकर व संज्योत वढावकर यांचे कामगारांकडून जाहीर आभार ऐतिहासिक करारामुळे आनंदोत्सव! रोहा-रायगड, दि. १२ (किरण मोरे) :- धाटाव औद्योगिक क्षेत्रातील नामांकित 'बेक केमिकल प्रा. लि.' कंपनीतील कामगारांच्या प्रलंबित वेतनवाढ व विविध मागण्यांवर अखेर यश संपादन झाले असून, जनरल मजदूर सभा ठाणेच्या यशस्वी मध्यस्थीमुळे कामगारांना ऐतिहासिक व भरघोस पगारवाढ मंजूर करण्यात आली आहे. कामगारांच्या हितासाठी सातत्याने संघर्ष करणारे ज्येष्ठ कामगार नेते, जनरल मजदूर सभा ठाण्याचे सरचिटणीस तथा हिंद मजदूर सभा महाराष्ट्र कौन्सिलचे सरचिटणीस संजयजी वढावकर तसेच संज्योत वढावकर मॅडम यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि अभ्यासू वाटाघाटींमुळे हा महत्त्वपूर्ण वेतन करार यशस्वीरीत्या पार पडला आहे. या यशस्वी करारासाठी रोहा युनिट प्रमुख सुहास खरविले यांच्यासह कमिटीचे अध्यक्ष संजय शेळके, उपाध्यक्ष राजेश बामुगडे, सेक्रेटरी विजय जाधव, खजिनदार संदीप रटाटे आणि सहसेक्रेटरी सतीश चावरेकर यांनी मोलाचे योगदान दिले. कामगारांना न्याय मिळवून दिल्याबद्दल बेक कंप...




Comments
Post a Comment