ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

धाटाव येथील 'बेक' कंपनीत कामगारांना भरघोस पगारवाढ

कामगार नेते संजयजी वढावकर व संज्योत वढावकर यांचे कामगारांकडून जाहीर आभार

 ऐतिहासिक करारामुळे आनंदोत्सव! 

रोहा-रायगड, दि. १२ (किरण मोरे) :- ​धाटाव औद्योगिक क्षेत्रातील नामांकित 'बेक केमिकल प्रा. लि.' कंपनीतील कामगारांच्या प्रलंबित वेतनवाढ व विविध मागण्यांवर अखेर यश संपादन झाले असून, जनरल मजदूर सभा ठाणेच्या यशस्वी मध्यस्थीमुळे कामगारांना ऐतिहासिक व भरघोस पगारवाढ मंजूर करण्यात आली आहे. कामगारांच्या हितासाठी सातत्याने संघर्ष करणारे ज्येष्ठ कामगार नेते, जनरल मजदूर सभा ठाण्याचे सरचिटणीस तथा हिंद मजदूर सभा महाराष्ट्र कौन्सिलचे सरचिटणीस संजयजी वढावकर तसेच संज्योत वढावकर मॅडम यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि अभ्यासू वाटाघाटींमुळे हा महत्त्वपूर्ण वेतन करार यशस्वीरीत्या पार पडला आहे. या यशस्वी करारासाठी रोहा युनिट प्रमुख सुहास खरविले यांच्यासह कमिटीचे अध्यक्ष संजय शेळके, उपाध्यक्ष राजेश बामुगडे, सेक्रेटरी विजय जाधव, खजिनदार संदीप रटाटे आणि सहसेक्रेटरी सतीश चावरेकर यांनी मोलाचे योगदान दिले. कामगारांना न्याय मिळवून दिल्याबद्दल बेक कंपनीतील सर्व जनरल मजदूर सभेच्या सभासदांनी व कामगार प्रतिनिधींनी संजयजी वढावकर आणि संज्योत वढावकर मॅडम यांचे मनापासून जाहीर आभार व्यक्त केले आहेत.

​कंपनी व्यवस्थापन आणि युनियन यांच्यात झालेल्या या करारात कामगारांच्या आर्थिक उन्नतीसोबतच त्यांच्या सेवाविषयक सुरक्षेचाही प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. करारातील तरतुदींनुसार प्रत्येक कामगाराला एकरकमी १२ हजार ५०० रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय कामगारांच्या सेवा कालावधीत वाढ करत निवृत्तीचे वय ५८ वरून थेट ६० वर्षे करण्यात आले आहे, ज्यामुळे कामगारांना अतिरिक्त दोन वर्षांचे सेवाछत्र लाभणार आहे. कामगारांच्या कामाची पोच पावती म्हणून त्यांना मिळणाऱ्या बक्षीस व सानुग्रह अनुदानाच्या रकमेतही घसघशीत वाढ करण्यात आली आहे. या कराराचे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद वैशिष्ट्य म्हणजे प्रदीर्घ काळापासून कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या २० कंत्राटी कामगारांना थेट कंपनीच्या सेवेत कायमस्वरूपी (पर्मनंट) नोकरीत समाविष्ट करून घेण्यात आले आहे. या निर्णयामुळे या कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबांच्या भविष्याला मोठे स्थैर्य लाभले आहे.

​धाटाव परिसरातील कामगार वर्गात या कराराचे अत्यंत उत्साहात स्वागत केले जात असून, संजयजी वढावकर आणि संज्योत वढावकर मॅडम यांच्या दूरदृष्टी व कामगारांच्या हिताच्या भूमिकेमुळेच हा ऐतिहासिक निर्णय शक्य झाल्याची भावना व्यक्त होत आहे. रोहा युनिट प्रमुख सुहास खरविले यांच्यासह युनिट अध्यक्ष संजय शेळके, उपाध्यक्ष राजेश बामुगडे, सेक्रेटरी विजय जाधव, खजिनदार संदीप रटाटे, सहसेक्रेटरी सतीश चावरेकर आणि बेक केमिकल प्रा. लि. धाटाव येथील सर्व कामगार प्रतिनिधी व कामगार बंधूंनी या कराराबद्दल आनंद व्यक्त करत युनियनच्या वरिष्ठ नेतृत्वाचे जाहीर आभार मानले असून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Comments

Popular posts from this blog