वाघेश्वर नगरातील कथित अनधिकृत बांधकामाला पाणी जोडणी? ग्रामपंचायत रोठ खुर्दकडे प्रदीप मोरे यांची तक्रार सखोल चौकशीची मागणी रोहा-रायगड, दि. ३० (किरण मोरे) :- वाघेश्वर नगर परिसरात सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकामावरून आणि त्या बांधकामाला देण्यात आलेल्या नळजोडणीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. सदर बांधकाम कथितरीत्या अनधिकृत असल्याचा आरोप करत ग्रामपंचायत रोठ खुर्दकडे याप्रकरणी लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्थानिक नागरिक प्रदीप काशिनाथ मोरे यांनी २३ सप्टेंबर २०२६ रोजी ग्रामसेवक तथा प्रशासक यांच्याकडे ही तक्रार नोंदवून संपूर्ण प्रकरणाची सखोल व तातडीने चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार, वाघेश्वर नगर येथे एका इमारतीचे बांधकाम सध्या सुरू असून सदर बांधकामाबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आहे. हे बांधकाम विनापरवाना व अनधिकृत असल्याचा संशय स्थानिक व्यक्त करत आहेत. त्यातच या बांधकामाच्या जागेवर थेट नळजोडणी देण्यात आल्याचे उघडकीस आल्याने ग्रामस्थांच्या भुवया उंचावल्या आहेत. नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध असलेल्या पाण्याचा गैरवापर जर व्यावसायिक इमारतीच्...
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
राष्ट्रीय महामार्ग क्र. ३४८ पागोटे-चौक ग्रीनफिल्ड भूसंपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध! पनवेल उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर कवडीमोल मोबदला अमान्य पनवेल-रायगड, दि. १ (सुरेश तांडेल) :- प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४८ पागोटे ते चौक जंक्शन ग्रीनफिल्ड महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला पनवेल, उरण आणि खालापूर परिसरातील बाधित शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. 'पागोटे-चौक ग्रीनफिल्ड जंक्शन महामार्ग संघर्ष समिती'च्या नेतृत्वाखाली बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने पनवेल येथील उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या महत्त्वपूर्ण बैठकीत शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या भूसंपादन प्रक्रियेवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आणि आपल्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना सुपूर्द केले. या निवेदनाद्वारे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या मनमानी आणि एकतर्फी कारभारावर तीव्र आक्षेप घेतला आहे. महामार्गाबाबतची कोणतीही पूर्वसूचना वेळेत प्राप्त न झाल्याने शेतकऱ्यांना कायदेशीर लेखी हरकती नोंदवता आल्या नाहीत, असे सांगत हा लेखी हरकत नोंदवण्याचा हक्क अबाधित ...




Comments
Post a Comment