रोह्याचे जागृत ग्रामदैवत श्री धावीर महाराज श्रद्धा, परंपरा आणि लोकसहभागाचा १७८ वर्षांचा गौरवशाली वारसा! कोणत्याही व्यक्तीच्या नावापेक्षा देवाचे नाव मोठे मानणारी परंपरा भक्ताच्या ओढीपोटी रोहा नगरीत आगमन; ब्रिटिशकालीन सशस्त्र पोलीस मानवंदनेची अनोखी परंपरा आजही अखंड सुरू! ॥ श्री धावीर महाराज की जय! ॥ रोहा-रायगड, दि. १२ (संदीप सरफळे) :- श्रद्धा ही केवळ उपासनेपुरती मर्यादित नसते, तर ती संकटात आधार देणारी, मनाला उभारी देणारी आणि जीवनाला नवी दिशा देणारी शक्ती असते. रोहा नगरीचे जागृत ग्रामदैवत श्री धावीर महाराज हे लाखो भाविकांच्या श्रद्धेचे असेच अधिष्ठान आहे. भक्तांच्या हाकेला धावून जाणारे, दुःखितांना धीर देणारे आणि संकटसमयी पाठीशी उभे राहणारे श्री धावीर महाराज म्हणजे रोहेकरांचे लाडके दैवत, त्यांचे आराध्य आणि त्यांच्या अस्मितेचा अविभाज्य भाग! भक्ताच्या निष्ठेपोटी रोहा नगरीत आगमन श्री धावीर महाराजांचे मूळ स्थान रोह्यापासून सुमारे आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वनराईत वसलेल्या वराठी गावात आहे. तेथील स्वयंभू मूर्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रोह्याचे तत्कालीन सुभेदार बळवंत वि...
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
साई येथील तटकरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा व वक्तृत्व स्पर्धेत घवघवीत यश सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव साई-माणगाव, दि. १३ (हरेश मोरे) :- तालुक्यातील साई पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सुनिल दत्तात्रेय तटकरे विद्यालय साई या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांसह वक्तृत्व स्पर्धेत या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील विद्यार्थिनी हित्तांक्षी हिने तालुकास्तरीय ३ किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवला होता, तिथेही तिने आपल्या खेळातील सातत्य राखत जिल्हास्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक संपादन केला. याबरोबरच कशिश सुभाष कालेकर याने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत उत्तम कामगिरी नोंदवत द्वितीय क्रमांक पटकावला, तर क्रीडा क्षेत्राबरोबरच बौद्धिक क्षेत्रातही विद्यालयाचा ठसा उमटवत अनुष्का अश्विन बनसोडे हिने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आपल्...




Comments
Post a Comment