कोल्हापूर मतमोजणी केंद्रातील सुरक्षाविषयक सुविधांचा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून आढावा कोल्हापूर (प्रतिनिधी) :- ४७ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी शासकीय धान्य गोडाऊन, रमणमळा, कसबा बावडा, कोल्हापूर येथे दि.४ जून रोजी सकाळी सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी आवश्यक सर्व सुविधांची तयारी प्रशासनाकडून पुर्ण झाली आहे. मतमोजणीसाठी आयोगाच्या सुचनांनूसार निश्चित केलेल्या आणि ओळखपत्र वितरीत केलेल्या अधिकारी, कर्मचारी, मतमोजणी प्रतिनिधी आणि माध्यम प्रतिनिधी यांना प्रवेश असणार आहे. मतमोजणी प्रक्रिया सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी मतमोजणी केंद्रावर सुरक्षेच्या अनुषंगाने अनेक प्रकारच्या सुविधा उभारण्यात आल्या आहेत. याचा आढावा जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांनी त्या त्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून घेतला. यामध्ये सीसीटीव्ही, बॅरीगेट, आत येण्याचा व बाहेर जाण्याचे मार्ग, सुरक्षा जाळी, ईव्हीएम मतमोजणी केंद्रात नेण्याचा मार्ग, गेटवरील व अंतर्गत पोलीस सुरक्षा, माध्यम कक्ष आदी ठिकाणी त्यांनी भेट देवून कामांची माहिती घेतली व आवश्यक सूचना केल्या. यावेळी त्यांनी उम...
ब्रेकिंग न्यूज




Comments
Post a Comment