शिवनेरी मार्शल आर्ट्स असोसिएशनच्या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत 'सुवर्ण' भरारी राज्यस्तरीय मार्शल आर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये शिवनेरी मार्शल आर्ट स्पोर्ट्स असोसिएशनचे ऐतिहासिक यश मुंबई (प्रतिनिधी) :- सायन येथील साधना विद्यालय येथे नुकत्याच संपन्न झालेल्या चौथ्या राज्यस्तरीय 'ऑल स्टाईल मार्शल आर्ट्स चॅम्पियनशिप २०२६' मध्ये शिवनेरी मार्शल आर्ट स्पोर्ट्स असोसिएशनच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याच्या जोरावर दैदिप्यमान यश संपादन केले आहे. २६ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या या भव्य स्पर्धेत शिवनेरीच्या शिलेदारांनी काता आणि कुमिते अशा दोन्ही प्रकारांत प्रतिस्पर्ध्यांना चारी मुंड्या चित करत पदकांची लयलूट केली. या स्पर्धेचे आयोजन 'ऑल स्टाईल मार्शल आर्ट्स असोसिएशन'च्या वतीने करण्यात आले होते. विशेष म्हणजे या स्पर्धेला 'कराटे इंडिया ऑर्गनायझेशन'ची (KIO) अधिकृत मान्यता लाभली होती, तर 'वर्ल्ड कराटे फेडरेशन' (WKF) आणि 'एशियन कराटे फेडरेशन' (AKF) यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून ही स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. या उच्चस्तरीय ...
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
रिमोट ऑपरेटिंग बोया ठरला देवदूत! काशीद समुद्रकिनारी बुडणाऱ्या दोन पर्यटकांना जीवदान अलिबाग-रायगड, दि. २९ (प्रतिनिधी) :- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यामुळे आज काशीद समुद्रकिनारी एक मोठा अनर्थ टळला. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडणाऱ्या डोंबिवली येथील दोन पर्यटकांना 'रिमोट ऑपरेटिंग बोया'च्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. फुरकन शेख (वय २८) आणि कैफ शेख (वय २२) अशी या वाचवलेल्या पर्यटकांची नावे असून, हे दोघेही सध्या सुस्थितीत आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डोंबिवलीहून आलेले हे पर्यटक काशीद बीचवर पर्यटनासाठी आले होते. समुद्रात पोहण्याचा आनंद घेत असताना अचानक दोघेही खोल पाण्यात ओढले गेले आणि बुडू लागले. यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल श्री.रोटकर आणि जीवरक्षक शिवम लाड यांनी तत्परता दाखवत परिस्थिती हाताळली. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या संकल्पनेतून नुकत्याच आपत्ती व्यवस्थापन विभागाला प्राप्त झालेल्या अत्याधुनिक 'रिमोट ऑपरेटिंग बोया'चा वापर या बचावकार्यात करण्यात आला. ...




Comments
Post a Comment