रोहा तहसील कार्यालयाचा एक हात मदतीचा
घरांच्या ताब्यासह रेशनकार्डचे वाटप
रोहा : किरण मोरे
रोहा तहसिल कार्यालयांतर्गत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त विवीध उपक्रम राबविले जात आहेत.
नागोठणे विभागातील पळस ग्रामपंचायतीमध्ये एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत पळस आदिवासी वाडीतील जानकी रामज्या पवार या आदिवासी महिलेला 25 कीलो तांदूळ व 10 गहु मोफत देण्यात देण्यात आले. तसेच कोलाड येथील आदिवासी बांधवाना तहसिलदार डॉ. किशोर देशमुख यांच्या हस्ते 143 आदिवासी बांधवाना गावठाण मंजूर करून घरे देण्यात आली.
याप्रसंगी नागोठणे विभागातील पळस ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये पुरवठा निरीक्षक अधिकारी उज्वला अंधारे, पळसचे सरपंच, उपसरपंच, तलाठी, पळसचे मिटेकर, माजी सभपती शिवराम शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक शिक्षक उपस्थित होते. तसेच रोहा तहसिलदार डॉ. किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिल कार्यालय महसूल विभागाच्या एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत पुरवठा निरीक्षक अधिकारी उज्वला अंधारे, अव्वल कारकून अभिजित महाडीक व कर्मचारी यांच्या उपस्थितीत सहकार्याने तालुक्यातील शिधापत्रिका धारकांना त्वरित दुय्यम प्रती देऊन मदत करण्यात आली.
यामध्ये कोलाड, वरसे, रोहा, नागोठणे, चाणेरा, आंबेवाडी, वणी अशा विवीध भागांतील शिधा पत्रिका धारकांना पुरवठा निरीक्षक अधिकारी उज्वला अंधारे यांच्या हस्ते त्वरित दुय्यम प्रतींचे वाटप करण्यात आले.