गळफास घेऊन 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या

नागोठणे : महेंद्र माने

नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुहीरे गावानजीक रिलायन्स कंपनीच्या जठ रोपा भागात झाडाच्या फांदीला एका 25 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार शुक्रवार 04 ऑगस्ट रोजी सकाळी साधारण 08.00 वाजण्याच्या सुमारास यशवंत रामा मरगळा रा. विराणी धनगरवाडी,ता. पेण या 25 वर्षीय तरुणांनी कोणत्या तरी अज्ञात कारणाने कुहीरे गावाच्या हद्दीतील रिलायन्स कंपनीच्या जठ रोपा भागात झाडाच्या सुमारे 25 फुट उंच असलेल्या फांदीला नायलॉनच्या रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत नागोठणे पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यू 013/2023 अशी नोंद झाली असून पुढील तपास स.पो.नि. संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रमोद कदम करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog