रायगड पोलीस व श्री विवेकानंद रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा संस्थेमार्फत एक्सेल व अंशूल कंपनीमधील ICDU टीमला आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षा प्रशिक्षण
रोहा : किरण मोरे
एक्सेल कंपनीची सेवाभावी संस्था श्री.विवेकानंद रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा – रायगड मार्फत रोहा तालुक्यामध्ये सामाजिक बांधिलकी अंतर्गत अनेक कामे केली जातात. अशातच एक्सेल कंपनी व अंशूल कंपनी मधील ICDU (आपत्कालीन व्यवस्थापन टीम) ला महत्वाचे असे प्रशिक्षण देण्यात आले. मुख्य व्याख्याते (प्रशिक्षक) श्री जयपाल पाटील रायगड भूषण आपत्ती व्यवस्थापन तज्ञ अलिबाग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास रोहा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद बाबर तसेच एक्सेल कंपनी उपमहाव्यवस्थापक श्री. संजय सपाटे साहेब, एच.आर.प्रमुख श्री. हाशीराम मंचेकर, सुरक्षा विभाग प्रमुख श्री.सुदाम करपे साहेब, CSR मॅनेजर तथा VRTI-ROHA संस्था प्रमुख श्री. रूळेकर, जे.एस. डब्ल्यू साळावचे निवृत्त फायर अधिकारी फायर एक्सपर्ट श्री. संदीप ढापरे, योगशिक्षक सुहास गाणु व श्री. विकास रणपिसे (सहाय्यक) इ. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणेश पूजन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले व कार्यक्रम सुरू केले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रशिक्षक श्री.जयपाल पाटील यांनी राष्ट्राचे संविधान वाचन करून केली. त्यानंतर योगशिक्षक श्री. सुहास गाणु यांनी योग विषयाची माहिती व प्रात्यक्षिक करून घेतले. तसेच जे.एस. डब्ल्यू निवृत्त फायर अधिकारी संदीप ढापरे यांनी आग लागल्यानंतर काय काळजी घ्यावी, आग कशी विजवावी आगी संबंधित माहिती, तोटे, औद्योगिक आग आणि घर परिसरआग,याची सखोल माहिती देण्यात आली. प्रशिक्षण दरम्यान लागलेली आज विजवण्यासाठी एमआयडीसी फायर स्टेशनला संपर्क केला व यावेळी 20 मिंनिटांमद्धे अमित हरमलकर फायरमन व त्यांचे सहकारी फायरगाडी सोबत घटनास्थळी पोहोचले अशाप्रकारे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. मा.श्री.जयपाल पाटील यांनी महाराष्ट्र शासनाचा आपत्ती कायदा 2015 ची माहिती व नैसर्गिक आपत्ती शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाची माहिती देऊन साप विंचू चावल्यास काय करावे हे प्रत्यक्षक दाखविले.
कोणत्याही प्रकारचे अपघात झाल्यास सर्वात प्रथम 108 रुग्णवाहिकेस बोलवावे. गरोदर महिला बाळंतपणासाठी जिल्हा-उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी नंबर 102 रुग्णवाहिकेला संपर्क करावा. प्रात्यक्षिक दाखवण्याकरिता रायगड दक्षिण 108 च्या प्रमुख डॉ. कांचन बिडवे यांना संपर्क साधताच 20 मिनिटात डॉक्टर रश्मी हुगे मॅडम व पायलट सचीन हे उपस्थित झाले. यावेळी यांनी. सी.पी.आर.ची माहिती व प्रात्यक्षिक दिले. अपघात झाल्यास सर्वात प्रथम 108 रुग्णवाहिकेस बोलवावे व पोलीस ठाण्यास कळवावे.तसेच डॉ. अंकिता खैरकर मॅडम उपजिल्हा रोहा रुग्णालयाच्या प्रमुख यांनी संपर्क करून 102 रुग्णवाहिका, परिचारिका व चालक तेजस सानप यांना पाठविले.
तसेच आपल्या महिलांच्या सुरक्षेसाठी कायम पोलीस दल कार्यरत असून यासाठी आपण 112 क्रमांकाचा वापर केल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यातून बीट अंमलदार किंवा महिला पोलीस आपल्या रक्षणासाठी हजर होतात. प्रात्यक्षिक दाखविताना रोहा पोलीस ठाण्यातून आशुतोष म्हात्रे उपस्थित राहून माहिती दिली.
आपल्या गावाशेजारी जंगलात आग लागली तर नंबर 1126 आपण संपर्क साधावा. कार्यक्रमाच्या वेळी वनपाल विकास सिंग राजपूत यांनी वनांची माहिती व मशीनचे प्रात्यक्षिक दिले. आणि वनरक्षन करणे आपले कर्तव्य असल्याचे संगितले. रायगड जिल्ह्यात अनेक प्रकारच्या आपत्तीस सामोरे जावे लागते. त्यासाठी गावा-गावातील पोलिस पाटील, कारखान्यातील कर्मचारी यांना हे प्रशिक्षण असल्यास ते कोणत्याही आपत्तिवर सहजरीत्या मात करू शकतील. पाटील साहेबांनी अत्यावश्यक यंत्रणाचे संपर्क क्रमांक दिले. सर्व प्रशिक्षणार्थीनची नोंद ठेऊन काही घटना घडल्यास स्वयंसेवक म्हणून कार्यरत राहतील. मा.श्री.जयपाल पाटील यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन टीम ला केले. हा त्यांचा ५०१वा कार्यक्रम असून त्याचा लाभ ५५ कर्मचारी अधिकारी यांनी घेतला. शेवटी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरक्षा विभाग अधिकारी श्री. सुदाम करपे यांनी केले. आभार प्रदर्शन करताना श्री.सुशील रुळेकर साहेब यांनी मा.श्री.जयपाल पाटील साहेब, माननीय डी.वाय.एस.पी. सोनाली कदम संपूर्ण एक्सेल कंपनी व अंशूल कंपनी तसेच ICDU टीम यांचे आभार मानले. कार्यक्रमास सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला. व्ही.आर.टी.आय. रोहा संस्थेमार्फत श्री. प्रसाद दगडे (कृषि विभाग प्रमुख) व अश्विनी फुलारे (पर्यावरण विभाग प्रमुख) उपस्थित होते. शेवटी पाणी वाचवा, झाडे लावा आणि झाडे जगवा हा संदेश देऊन कार्यक्रम संपन्न झाला.