बेकायदा दारूधंद्यांवर रायगड एलसीबीची धाड, गावठी हातभट्ट्या केल्या उध्वस्त!

अलिबाग : प्रतिनिधी

अवैध गावठी हातभट्टीवर रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शिघ्रे येथील नवीवाडी येथे छापा टाकला. या छाप्यात १३ हजार रुपये किंमतीची १३० लिटर दारुचा साठा जप्त करण्यात आला असून गोपाळवट व नागशेत येथील दोघांविरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुरुड तालुक्यातील नवीवाडी येथे बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टी दारु विक्रीचा व्यवसाय सुरु असल्याची माहिती रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलसी उपनिरीक्षक विशाल शिर्के, सहाय्यक फौजदार दीपक मोरे, पोलीस नाईक सचिन वावेकर, पोलीस शिपाई ईश्वर लांबोटे, स्वामी गावंड, ओमकार सोंडकर यांचे पथक नेमण्यात आले. या पथकाने शिघ्रे येथील नवीवाडी येथे छापा टाकला. त्यात महादेव हिरवे यांच्याकडून ८ हजार रुपये किंमतीचा व दिपक मोरे यांच्याकडून पाच हजार रुपये किंमतीचा अवैध दारुचा साठा जप्त केला. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog