🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रोहा येथे सेवा दिन साजरा

भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातुन भाजी विक्रेत्या महिलांना छत्री वाटप कार्यक्रम

रोहा : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, भारतीय जनता पक्षाचे कणखर नेतृत्व श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपुर्ण महाराष्ट्र राज्यात सेवा दिन साजरा केला जात आहे. महाराष्ट्रसाठी सेवा कार्य करणारे उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर वगैरे न लावता शक्य होईल त्या गरजू नागरिकांसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सेवाभावी कार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखरजी भावनकुळे यांनी केले. 

या सेवा दिनाचे औचित्य साधुन रोहा मध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातुन विविध सामाजिक उपक्रम केले जात आहेत.

रोहा तालुक्यातील विविध भागातून शहरामध्ये आपल्या उदरनिर्वाहासाठी आदिवासी महिला भगिनी येत असतात, सदर महिला रस्त्यावर बसून भाजी, फळे विकत असताना त्यांचे पावसापासून रक्षण व्हावे म्हणून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातुन छत्री वाटप कार्यक्रम रोहामध्ये करण्यात आला, असे भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अमितजी घाग यांनी सांगितले. 

सदर आदिवासी महिलांसाठी छत्री वाटप करून शासनाच्या अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचे काम आगामी काळात आम्ही करू तसेच मोदीजींच्या सरकारला 9 वर्ष पुर्ण होत असताना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत संपर्क व संवाद साधण्याची संधी आदरणीय उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधुन सेवा कार्याच्या माध्यमातून मिळाली, असे भाजपचे युवा कार्यकर्ते रोशन चाफेकर यांनी सांगितले. 

या सेवा कार्यामध्ये धाटाव विभाग अध्यक्ष कृष्णा बामणे,भाजप कामगार मोर्चा तालुका अध्यक्ष विलास डाके, दक्षिण रायगड जिल्हा विद्यार्थी संपर्क प्रमुख वैभव कुळकर्णी, युवा मोर्चा जिल्हा सचिव नरेश कोकरे, रिया कासार, मंदार शेलार यांची उपस्थिती होती. यावेळी सर्व महिलांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

Comments

Popular posts from this blog