किरण बाथम यांना राज्यस्तरीय कै. मधुकर लोंढे पत्रकारिता पुरस्कार प्रदान
मुंबई : प्रतिनिधी
रायगडचे ज्येष्ठ पत्रकार किरण बाथम यांना ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कलचा राज्यस्तरीय कै.मधुकर लोंढे राज्यस्तरीय पुरस्कार मार्मिकचे संपादक मुकेश माचकर यांच्या उपस्थितीत निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांच्याहस्ते मुंबईत प्रदान करण्यात आला.यावेळी राज्यातील सात पत्रकारांना सन्मानित करण्यात आले.
1987 पासून निर्भीड, निरपेक्ष, निष्पक्ष, अष्टपैलू पत्रकारिता करणारे किरण बाथम रायगड जिल्ह्यातील राज्यपातळीवर पत्रकारांचे नेतृत्व करणारे पत्रकार आहेत. वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनल मधून त्यांची कारकीर्द खुप गाजलेली आहे.समारंभाचे अध्यक्षस्थानी मार्मिक चे कार्यकारी संपादक मुकेश माचकर होते तर प्रमुख मार्गदर्शक डॉ. संभाजी खराट , देवेंद्र भुजबळ ,यासिन पटेल, गणेश कोळी, एल. बी.पाटील यांची उपस्थिती समारंभाला शोभा आणणारी ठरली.
"ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल" राष्ट्रीय पत्रकार संघटनेचा राज्यस्तरीय पत्रकार सन्मान सोहळा गांधी बुक सेंटर, ग्रँड रोड,मुंबई येथे मान्यवरांच्या संपन्न झाला. यावेळी संघटनेच्या वाटचालीची माहिती संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल यांनी दिली.
तर 92 वर्षीय ज्येष्ठ पत्रकार बाळ पाटणकर यांच्या "इस्लामी जगत" पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. समारंभाचे सूत्रसंचालन पत्रकार ईश्वर हुलवान यांनी केले. मुंबई आणि राज्यातील अनेक पत्रकारांची यावेळी उपस्थिती होती.