जागतिक महिला दिनानिमित्त हळदी कुंकू समारंभ संपन्न
पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर
माणगांव तालुक्यातील विळे गावठाण येथील भैरी मंदिरात नायक मराठा ज्ञाती मंडळ विळे विभागातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात शेकडो महिलांनी सहभाग घेतला होता. नायक मराठा ज्ञाती मंडळातर्फे दर वर्षी हळदी कुंकू समारंभचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाचा उद्देश असा की नायक मराठा समाज एकत्रित येऊन मोठी संघटना तयार करणे, समाजातील उच्य शिक्षित, पदवीधर विद्यार्थ्यांचा गुण गौरव करणे, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करणे, महिलांना आरोग्य व बचतगट संबंधित मार्गदर्शन करणे, पुढील येणाऱ्या वर्षाचे कॅलेंडर छापून जाहिराती मार्फत परिसरातील व्यापारी, व्यवसायिक बंधू भगिनींना प्रसिद्धी देणे असा उद्देश आहे. या कार्यक्रमास विभागातील सरपंच, सदस्य तसेच मंडळाचे अध्यक्ष प्रताप बांदल, सचिव मंगेश पोळेकर, सहसचिव दिनकर कडू, खजिनदार संभाजी जाधव, सह खजिनदार देविका पाबेकर, कमिटी सदस्य राजू लाड, दिलीप राजिवडे व बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.