पाटणूस मध्ये रामनवमी उत्साहात साजरी
पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर
माणगांव तालुक्यातील पाटणूस येथे हनुमान मंदिरात रामनवमी दिनी गुरुवार दि 30 मार्च 2023रोजी श्री राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. पाटणूस चे रहिवासी श्री मोरेश्वर शिवराम म्हामुणकर व त्यांच्या पत्नी सौ. समृद्धी हे पती पत्नी यांनी वडिलोपर्जित आलेली ही रामनवमीची परंपरा आज तागायत जपली आहे.
राम नवमीला ग्रामस्थांची खूप गर्दी असते. सकाळी काकडा आरती, दुपारी 12 वाजेपर्यंत अर्थात श्रीरामाचा जन्म होई पर्यंत ग्रामस्थ भजन करतात. राम जन्म झाल्यानंतर महिला पाळणा गातात. कार्यक्रम पूर्ण झाल्या नंतर सम्पूर्ण गावातील ग्रामस्थ यांना श्री मोरेश्वर यांच्या वतीने भोजनाची व्यवस्था असते. भोजन केल्यानंतर ग्रामस्थ घरी जातात.