विळे वरचीवाडी आयोजित नववर्ष स्वागत शोभायात्रा बाईक रॅली 

हिंदू नववर्षाचा दिवस, गुढी उभारण्याचा दिवस!

पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर

चैत्र शुद्ध प्रतिपदा, श्री शालिवाहन, शोभननाम संवत्सर, शके १९४५ प्रारंभ बुधवार दि.२२ मार्च २०२३ रोजी विळे वरचीवाडी गावातील तरुण मंडळी आणि ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या विचाराने प्रथमच ह्या वर्षी नववर्ष स्वागत शोभायात्रा बाईक रॅली काढण्यात आली. *चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट,नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच खरी सुरूवात. गुढीपाडवा नववर्ष स्वागत शोभायात्रा निमित्त २२/०३/२०२३ सकाळी ठीक १० वाजता बाईक रॅली काढण्यात आली. यामध्ये गावातील तरुण मंडळी आणि ग्रामस्थ सर्वजण पारंपारिक वेशात नवीन कपडे परिधान करून नववर्ष शोभायात्रेत सहभागी झाले होते. 

बाईक रॅली सुरू झाल्यानंतर सर्वजण श्री रामाचं जयघोष, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आणि भारत मातेचा जयघोष करत नववर्ष स्वागत शोभायात्रा गावातून काढण्यात आली. तसेच गावातील सर्व मंदिरामध्ये जाऊन देवी देवतांच दर्शन देखील घेण्यात आलं. त्यानंतर ग्रामदैवत भैरीबुवाच देखील दर्शन घेण्यात आलं. यामध्ये नववर्ष स्वागत बाईक रॅली शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या गावातील तरुणांचा आणि गावातील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याबद्दल विळे वरचीवाडी गावातील नववर्ष स्वागत शोभायात्रेत सहभागी झालेल्या सर्व तरुणांचं आणि ग्रामस्थांच गावातील ज्येष्ठ मंडळींनी सर्वांचे विशेष कौतुक केलं आणि मनापासून आभार मानले. गुढी पाडवा व नूतन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या .

Comments

Popular posts from this blog