पाटणूस मध्ये बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त हळदी कुंकू समारंभ

पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर

माणगाव तालुक्यातील पाटणूस विभागात बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने माणगाव महिला संपर्क प्रमुख कविता नलावडे व महिला तालुका प्रमुख अस्विनी म्हामुणकर यांच्या वतीने महिला हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रम दक्षिण रायगड सह संपर्क प्रमुख स्वाती सखाराम दबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सम्पन्न झाला. सदर कार्यक्रमास महाड पोलादपूर विधानसभा संपर्क प्रमुख स्वाती घोसाळकर, महाड संपर्क प्रमुख ज्योती मनवे इ. मान्यवर महिला उपस्थित होत्या. तसेच पाटणूस पंचक्रोशीतील महिलांनी हळदी कुंकू समारंभाला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून भरघोस प्रतिसाद दिला.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाटणूसच्या सौ. शिवानी संजय म्हामुणकर (माणगांव महिला आघाडी तालुका प्रमुख), श्रीमती शर्मिला म्हामुणकर (पाटणूस महिला आघाडी प्रमुख) सौ. सुवर्णा राणे (पाटणूस महिला आघाडी कार्यकर्त्या ), सौ. साक्षी सेजवळ (महिला आघाडी कार्यकर्त्या) यांनी विशेष मेहनत घेतली.

Popular posts from this blog