पाटणूस येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आई सोमजाई क्रीडा मंडळ पाटणूस आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा संपन्न
पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर
माणगांव तालुक्यातील पाटणूस येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आई सोमजाई क्रीडा मंडळ पाटणूस आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आले होते. 11फेब्रुवारी 2023रोजी निजामपूर विभागीय कबड्डी स्पर्धा तर 12 फेब्रुवारी 2023रोजी कोलाड विभागीय कबड्डी स्पर्धा. असे या कबड्डी स्पर्धेचे आयोजन होते. 11फेब्रुवारी रोजी निजामपूर विभागातून 8 संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामना आई सोमजाई पाटणूस संघ व उंबर्डी यांच्यात होऊन पाटणूस संघ अंतिम विजेता ठरला.
12 फेब्रुवारी 2023 रोजी कोलाड विभागीय स्पर्धेत 16 संघांनी सहभाग नोंदवाला. यामध्ये अंतिम सामना आंबेवाडी व चिल्ले या संघांमध्ये झाला. अंतिम विजेता आंबेवाडी संघ ठरला. अंतिम विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व टॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.सदर स्पर्धेचे आयोजन आई सोमजाई क्रीडा मंडळ पाटणूस माणगावच्या वतीने, महाविकास आघाडी पुरस्कृत भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्व जबाबदारी श्री संजय (पप्पा ) म्हामुणकर, निष्ठावान शिवसैनिक, झुंजार नेतृत्व व सौ. शिवानी म्हामुणकरे (माणगांव तालुकाप्रमुख महिला आघाडी आणि श्रीमती शर्मिला म्हामुणकर (महिला आघाडी शाखा पाटणूस यांनी घेतली होती. हीं स्पर्धा उत्तम नियोजन पूर्व क व दिमाखदार संपन्न झाली.
या स्पर्धेस श्री अनिल नवगणे ((दक्षिण रायगड जि. प्रमुख ), श्री संजय मनाजी कदम (दक्षिण रायगड सम्पर्क प्रमुख, अंधेरी (पश्चिम )विधान सभा संघटक यांनी आवर्जून भेट दिली व खेळाडूंचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांना मार्ग दर्शन केले. असे खेळाडूंना प्रोत्साहन देणारे, संस्कृती जपणारे कार्यक्रम आयोजित झाले पाहिजेत व शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या माध्यमातून ते नेहमी होत राहतील हा विश्वास दिला.तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून श्री संजय म्हामुणकर (निष्ठावंत शिवसैनिक )श्री चंद्रकांत सुर्वे (उप विभाग अधिकारी पाटणूस /विळे विभाग मुंबई )व श्री गोविंद भगवान मालुसरे (उवासेना अधिकारी पाटणूस /विळे विभाग मुंबई )यांच्या पुढाकाराने विभागातील विभागातील अनेक तरुणांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षात प्रवेश केला. (वैभव म्हामुणकर, दिनेश दिपक दळवी, सागर येरुणकर, ओंकार म्हामुणकर, साई म्हामुणकर, विजय जगताप, रोशन पवार, सागर जाधव, योगेश पवार, यशवंत हिलम व 50कार्यकर्त्यांनी व त्यांचे सर्व सहकारी यांनी आपण पक्ष प्रमुख आद. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब तसेच संजय मानाजी कदम यांच्या सोबत राहणार असा निर्धार केला. या कार्य क्रमास श्री गजानन अधिकारी ता. प्रमुख माणगाव, श्री चंद्रकांत पवार उप तालुका प्रमुख माणगाव श्री किशोर साखळे उप विभागप्रमुख, श्री अरविंद गुलंबे शिव अवजड सेना तालुका प्रमुख, श्री किशोर बामगुडे शिव अवजड सेना उप तालुका प्रमुख, श्री शैलेश सार्दळ, श्री अविनाश गुलंबे आशा अनेक पदाधिकाऱ्यांनी स्पर्धेस भेट दिली.