ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

न्यूज चॅनलमधून हाकलपट्टी केली म्हणून संपादकावर हल्ला! 

रोहा येथील समीर बामुगडे आणि गुंड काशिनाथ बामुगडे याच्याविरूद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल  

चॅनलमधून हाकलले म्हणून हल्ला करण्यासाठी काशिनाथ बामुगडे नावाच्या गुंडाला दारू पाजून सोबत आणले!

रोहा : प्रतिनिधी

बातमी लिहिती येत नाही, विशेष म्हणजे हातात कागद आणि पेन दिल्यानंतर चार ओळी पण लिहिता येत नाही, तसेच सर्वसामान्यांना त्रास देणे, दमदाटी करणे, खंडणी मागणे यांसारख्या प्रकारांमुळे त्याच्या विरूद्ध पोलीस ठाणे, फॉरेस्ट डिपार्टमेंट येथे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाल्यामुळे न्यूज २४ तास मराठी (वेब न्यूज) च्या संपादकांनी रोहा तालुक्यातील निवी येथील समीर रामा बामुगडे याची "न्यूज २४ तास मराठी" मधून हाकलपट्टी केली. 

हाकलपट्टी केल्याचा राग त्याच्या मनात खदखदत होता. दरम्यान, त्याने निवी येथील काशिनाथ बामुगडे नावाच्या गुंडाला दारू पाजून सोबत आणले आणि "न्यूज २४ तास मराठी" च्या संपादकांवर रोहा-दमखाडी नाका याठिकाणी हल्ला केला. हल्ला झाल्यानंतर संपादक यांनी याप्रकरणी रोहा पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदविल्यानंतर पोलीसांनी निवी येथील समीर बामुगडे आणि त्याचा साथीदार काशिनाथ बामुगडे या दोघांविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे. 

यांतील काशिनाथ बामुगडे हा पेंटर म्हणून ओळखला जात असून तो गुंड प्रवृत्तीचा असल्याचे दिसून आलेले आहे. दारू पिऊन लोकांना दमदाटी करणे, भाईगिरी करणे असे प्रकार या काशिनाथ बामुगडेचे दिसून आलेले आहेत.

Comments

Popular posts from this blog