राज्यस्तरीय एल्बोबॉक्सिग स्पर्धेत रायगड जिल्हा ठरला तृतीय अजिंक्य पदाचा मानकरी
चंद्रशेखर सावंत : प्रतिनिधी
पुणे पिंपरी चिंचवड येथे तिसरी राज्यस्तरीय एल्बोबॉक्सिंग स्पर्धा महाराष्ट्र एल्बोबॉक्सिंग असोसिएशन व यू.एफ.सी.असोशीएशन व पिंपरी चिंचवड एल्बोबॉक्सिंग असोसिएशन ह्यांच्या विद्यमाने घेण्यात आली ह्या स्पर्धेत युनायटेड शोतोकान कराटे असोशिएशन ह्या संस्थेत शिहान रविंद्र रमेश म्हात्रे (पप्पू सर) ह्यांच्या कडे एल्बोबॉक्सिंग चे प्रशिक्षण घेत आसलेले विद्यार्थी रायगड एल्बोबॉक्सिंग असोसिएशनच्या टीम मध्ये निवड झालेल्या रुद्रेश प्रथमेश पाटील,(गोल्ड मेडल) अनुज राजेंद्र जाधव, (गोल्ड मेडल) रितुल रविंद्र म्हात्रे, (गोल्ड मेडल) तेजश्री बापू ऐवळे(गोल्ड मेडल), प्रियल हेमंत म्हात्रे, (गोल्ड मेडल) सदफ मंजूर पठाण,(गोल्ड मेडल) हर्षाली पेणकर,(गोल्ड मेडल) तसेच सलोनी चंद्रशेखर सावंत (सिलव्हर मेडल)ओम बापू ऐवळे (सिलव्हर मेडल) मोहत परशुराम कोठेकरल (सिलव्हर मेडल) कार्तिक राजेंद्र जाधव (सिलव्हर मेडल) ह्या खेळाडूंनी सात गोल्ड मेडल व चार सिलव्हर मेडल पटकाऊन रायगड जिल्हाला तृतीय क्रमांकाचे आजिंक्यपद संपादित केले विजयी झालेल्या सर्व खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रच्या एल्बोबॉक्सिंग संघांत निवड करण्यात आली. ह्या सर्व स्पर्धा महाराष्ट्र एल्बोबॉक्सिंग असोशीएशन चे अध्यक्ष सुरेश कोळी सर सचिव यशवंत माने सर खजिनदार सागर कोळी सर राहुल म्हेत्रे सर, संदीप माने सर सुशांत माने सर ह्या सर्वांच्या उपस्थित मध्ये पार पडल्या. सर्व विजयी खेळाडूंचे युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर सर तसेच युनायटेड चे पदाधिकारी व प्रशिक्षक सागर कोळी सर, प्रशांत घांगुर्डे सर, निलेश भोसले सर, प्रतिक कारंडे सर, अदित्य तेरेदेसाई सर,प्रथमेश मोकल सर,विनायक पाटील सर ,प्राजक्ता तेटमे मॅडम ,निलेश ओव्हळ सर ह्यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.