हमरापुर ग्रामपंचायत मध्ये माजी सरपंच यांचा दारुण पराभव करत राकेश दाभाडे विजयी
चंद्रशेखर सावंत : प्रतिनिधी
पेण तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून हमरापुर ग्रामपंचायत मध्ये गाव विकास आघाडीने मोठा विजय मिळवीला. हमरापुर ग्रामपंचायत चे माजी सरपंच प्रदीप म्हात्रे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. परंतु आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार राकेश दाभाडे यांनी त्यांचा 653 मतांनी पराभव केला. गावातील जनतेने गाव विकास आघाडीच्या उमेदवारांना कौल देऊन आघाडीचे सात उमेदवार व सरपंच यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले.निवडणुकीमध्ये सचिन पाटील यांचा मोलाचा वाटा होता तसेच संदेश कदम यांनी सुद्धा विशेष मेहनत घेऊन आठ उमेदवार निवडून आणले. निवडणुकीमध्ये राकेश दाभाडे यांनी मनोहर पाटील व प्रदीप म्हात्रे यांचा मोठ्या फरकाने पराभव करत सरपंच पदी विराजमान झाले.त्यांच्यासोबत विजयी उमेदवारांना पडलेली मते राकेश दाभाडे सरपंच 768 ओमकार पाटील 261 रवींद्र शेद वळ 281 सायली मांडलेकर 304 संजय पाटील ३१२ युवराज म्हात्रे 288 पायल सुर्वे 244, सुप्रिया पाटील285,यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.