दिघी गावचे रहिवाशी महादू गोविंद कावळे यांचा न्याय हक्कासाठी उपोषणाचा इशारा

रोहा  : किरण मोरे

श्रीवर्धन तालुक्यातील दिघी गावचे रहिवाशी श्री.महादू गोविंद कावळे यांनी दिनांक १५ डिसेंबर २०२२ रोजी ग्रुप ग्रामपंचायत 

कार्यालय दिघी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसण्याचा  इशारा दिला आहे. श्रीवर्धन तालुक्यातील संबंधित शासकिय यंत्रणेसह वरीष्ठ शासकिय यंत्रणेकडे लेखी स्वरूपात पाठपुरावा करून तसेच अनेक वर्षांपासून संबंधित शासकिय कार्यालयांमध्ये फेऱ्या मारून सुध्दा न्याय मिळत  नसल्याने अखेर शेवटी बेमुदत आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्यांच्या कडून सांगण्यात आले.तसेच अनेक वर्षांपासून शासन दरबारी हेलपाटे मारून सुद्धा अद्यापपर्यंत कोणतेही सहकार्य मिळालेले नाही. बेमुदत आमरण उपोषणास बसण्यासंबंधी सर्व कायदेशीर तरतुदींनुसार सर्व संबंधित प्रक्रिया पूर्ण केल्या असून याबाबत लेखी पत्रा द्वारे "माझा हक्क मला मिळावा" अशा मागणीचे पत्र दिघी सागरी पोलीस स्टेशन बोर्ली पंचतन, गटविकास अधिकारी-पंचायत समिती कार्यालय श्रीवर्धन, तहसिलदार श्रीवर्धन, प्राथमिक आरोग्य केंद्र बोर्ली पंचतन, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद-रायगड-अलिबाग, जिल्हाधिकारी-रायगड-अलिबाग यांना दिले आहे.

Comments

Popular posts from this blog