प्रदूषण पसरविणाऱ्या कंपनीचा अधिकारी झालाय सैरभैर, बुद्धीला पकडलीय बुरशी?

रोहा : किरण मोरे

रोहा तालुक्यातील धाटाव एम.आय.डी.सी. परिसरात कंपनीमार्फत मोठ्या प्रमाणात प्रदूषण सुरू आहे. परंतु प्रदूषण पसरविणाऱ्या एका कंपनीचा अधाकारी सैरभैर झाल्याचे दिसत असून त्याच्या बुद्धीला तर "बुरशी" पकडलीय का? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे! कारण ज्या विषयांमध्ये "कवडी"चे देखील ज्ञान नाही, अशा विषयांवर ढोल बडवून आपण किती ज्ञानी आहोत आणि आपली अक्कल डोक्यात नसून गुडघ्यात आहे हे तर हा अधिकारी स्वतःच जाहिर करू लागला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याचे अक्कलेचे तारे किती चमकतात हे तर तो स्वतःच दाखवू लागला आहे. या कंपनीच्या अधिकाऱ्याची बुद्धी म्हणजे एखाद्या सडलेल्या कांद्यासारखी असून आता तर त्याच्या बुद्धीला "बुरशी" पकडल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. निरर्थक बडबड करणारा हा किती बालिश बुद्धीचा अधिकारी आहे ते स्पष्ट होत चालले आहे. कंपनीचे प्रदूषण पसरवून देखील स्वतःचा कातडी बचाव करण्यासाठी निरर्थक बडबड करणाऱ्या या अधिकाऱ्याच्या विरोधात आता उच्चस्तरिय तक्रारी दाखल होणार असल्यामुळे याचे "पितळ" उघड पडण्याच्या मार्गावर आलेले आहे. 

कंपनीच्या प्रदूषणामुळे वातावरण प्रदूषित होत चाललेले असून अनेकांना दमा, खोकला यांसारखे श्वसनाचे आजार झाल्याच्या घटना यापूर्वी अनेक वेळा घडलेल्या असून सकाळी मोकळ्या हवेत फेरफटका मारणासाठी बाहेर पडणाऱ्यांना तर प्रदूषित हवेचा सामना करावा लागत आहे, मात्र हे या "बडबड्या" अधिकाऱ्याला दिसत नाही का? असा संतप्त सवाल येथील स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे!

Comments

Popular posts from this blog