शिहू येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ची दुर्गामाता दौड

मंजुळा म्हात्रे : प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या पवित्र मातीत लाखो धर्म रक्षक राष्ट्र प्रेमी आणि देशभक्त जन्माला यावेत हे आई भवानी चरणी वरदान मागण्यासाठी श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने दुर्गा माता दौड दि.२ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली होती

या वेळी तरुणांसह महिलांनी डोक्यावर भगवे फेटे बांधून हातात भगवे झेंडे घेऊन आई जगदंबेचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा उधघोष करत दुर्गामाता दौडित सहभाग दर्शवला. प्रत्येक भागात दौडीचे मोठया उत्सहात  दारोदारी रांगोळी काढून घरावर भगवे ध्वज उभारून काही ठिकाणी फटाके उडवून दौडीचे स्वागत केले.

हिंदू संस्कृती जपण्यासाठी तसेच प्रत्येकाच्या मनामध्ये हिंदुत्वाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी विशेष करून युवतींनी स्वावलंबी व्हावे हा या मागचा उद्देश असल्याचे श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी योगेश ठाकूर यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog