साखरचौथ गणेशोत्सवा निमित्त आगळा वेगळा उपक्रम

मंजुळा म्हात्रे : प्रतिनिधी

गावाची, समाजाची उतराई होण्यासाठी अनेकजण उपक्रम राबवितात असाच एक उपक्रम श्री. गणेश मित्र मंडळ चोळे-टेप यांच्या माध्यमातून राबविण्यात आला. पर्यावरणाचा संदेश देत त्यांनी 'घर तिथे झाड' लावून संरक्षण व संगोपणाची जबाबदारी घेत जास्वंदाच्या रोपांचे वाटप केले.

श्रीगणेश मित्र मंडळाचे हे १५ वे वर्ष आहे. दरवर्षी मंडळामार्फत वेगवेगळे उपक्रम राबविले जातात यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांना शाळाउपयोगी वस्तूंचा वाटप, कर्तृत्ववान महिलांचे सत्कार केले जातात.

या वर्षी देखील महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे मंडळाचे अध्यक्ष नितीन पाटील, दिपक पाटील प्रशांत म्हात्रे यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी विशेष मेहनत ग्रामस्थ मंडळ चोळे व बापदेव महिला मंडळ चोळे-टेप यांनी घेतली.

Comments

Popular posts from this blog