पेट्रोल पंपत धक्कादायक प्रकार रॉकेल मिश्रीत डिझेल ने उडाली खळबळ

मंजुळा म्हात्रे : प्रतिनिधी 

नागोठणे येथे धक्कादायक प्रकार समोर आला असून मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या नागोठणे नजीक  भारत पेट्रोल पंपावर ग्राहकांना रॉकेल मिश्रित डिझेल दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे विभागात एकच खळबळ उडाली आहे नागोठणे विभागातील हजारो ग्राहक याच पेट्रोल पंपात डिझेल व पेट्रोल भरण्यासाठी येत असतात मात्र पेट्रोल पंप त्यांची फसवणूक करत असल्याचा प्रथमदर्शनी दिसून येत आहे नागोठणे नजीक असलेल्या सुकेळी येथील विक्रम चालक जनार्दन कदम हे काल दिनांक २२ रोजी सायंकाळी साधारणपणे सात वाजता या भरत पेट्रोल पंपात गाडीत डिझेल भरणा करण्याकरिता आले असता  त्यांनी सातशे रुपयाचे डिझेल त्यांची मालकीची गाडी  क्रमांक Mh 06 bw 3739 मॅजिक मंत्रा या वाहनांमध्ये रक्कम रुपये सातशे चा डिझेल टाकला होता व दुसऱ्या दिवशी ते नेहमीप्रमाणे नागोठणे येथील पाली येथे जात असताना उन्हेरे फाटा येथे अचानकपणे त्यांची गाडी लॉक होऊन धूर निघू लागला त्यामुळे त्यांनी सदरची गाडी ही तात्काळ गॅरेजवर तपासणी करता नेली. त्यावेळेस मेकॅनिकलने गाडीमधून डिझेल मिश्रित रॉकेल हे साधारणपणे दोन कॅन बाहेर काढले. याबाबत कदम यांनी तात्काळ येऊन सदरच्या व्यवस्थापनाकडे विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तर मात्र देण्यात आलं नाही या प्रकारामुळे नागोठणे वासियांची व विभागातील जनतेची साधारण किती दिवस फसवणूक होत असेल याचा अंदाज लावणं मात्र कठीण आहे या पंप मालकाविरोधामध्ये यथोचित कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागोठणे वासियांकडून केली जात आहे.

"मी व्यवसायाने एक विक्रम चालक असून नागोठणे ते पाली माझी नियमित विक्रम चालत असते  नेहमीप्रमाणे मी नागोठणे येथून प्रवासी घेऊन पाली येथे जात असता दिनांक 23 रोजी माझी गाडी उन्हरे फाटा येथील पुलावर अचानकपणे लॉक झाली मी तात्काळ गाडी गॅरेजला दाखवली असता गाडीमध्ये रॉकेल मिश्रित डिझेल असल्याचे निष्पन्न झाले. मी लागलीच पंपावर येऊन पंप व्यवस्थापकाकडे तक्रार केली."

 - जनार्दन कदम, विक्रम चालक नागोठणे

"ज्यावेळेस पेट्रोल पंपामध्ये डिझेल भरून आलेला टँकर खाली केला जातो तेव्हा एक सुरक्षेची पद्धत म्हणून आमच्या मोबाईलवर ओटीपी क्रमांक येतो ओटीपी क्रमांक दिल्याशिवाय टँकर खाली करता येत नाही त्यामुळे ग्राहकाच्या तक्रारीनुसार संबंधित डिझेलचे नमुने हे अधिकारी तपासून योग्य ती कारवाई करतील."

 - युसूप पेट्रोल पंप व्यवस्थापक 

"या भारत पेट्रोलियम पंपामध्ये नागोठण्यातीलच नव्हे तर विभागातील ग्राहक डिझेल व पेट्रोल भरण्यासाठी येत असतात त्यांची जर फसवणूक होत असल्याचे निष्पन्न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल."

 - साईनाथ धुळे, रायगड जिल्हा सचिव मनसे 

"सदरच्या पंपाबाबत भ्रमणध्वनीद्वारे नागरिकांची तक्रार प्राप्त झाली असून तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना उचित कारवाईसाठी सदरच्या पंपात पाठवण्यात आले आहे."

  - कविता जाधव, तहसीलदार रोहा

Popular posts from this blog