विना परवाना खैराची वाहतूक करणारा टेम्पो रोहा वनविभागाच्या पथकाने पकडला
4 लाख 8 हजारांचा मुद्देमाल जप्त, दोघांविरूद्ध गुन्हा दाखल
रोहा : प्रतिनिधी
मुंबई - गोवा महामार्गावरील खांब गावाजवळ खैर लाकडाची विनापरवाना वाहतूक करणारा टेम्पो वनविभागाच्या पथकाने पकडला असून 4 लाख 8 हजार 225 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपवनसंरक्षक रोहा व सहाय्यक वनसंरक्षक रोहा श्री विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी रोहा श्री मनोज वाघमारे व वनपाल श्री राजेंद्र गायकवाड, वनरक्षक एस. डी. देवकांबळे, एस एस भगत, एस एन शिद, एस एम मुळे, अंगद भोसले, मंगेश पव्हरे, तेजस नरे, योगेश देशमुख, पोपट करांडे, अजिंक्य कदम यांनी 24 सप्टेंबर 2022 रोजी पहाटे 2.00 वाजता मिळालेल्या गुप्त बातमी वरून मुंबई - गोवा राज्यमार्ग क्र.६६ वर खांब गावाजवळ महेंद्रा टेम्पो क्रमांक MH/06/BW/5571 ची तपासणी केली असता खैर सोलीव नग 48 घ.मी.0.558 किंमत 8255/- रुपये व वाहन क्रमांक MH/06/BW/5571 अंदाजे किंमत 4,00,000/- रुपये विनापरवाना वाहतूक करीत असताना आढळून आला. सदर वाहनावर भारतीय वनअधिनियम 1927 अंतर्गत गुन्हा दाखल करून वाहन व खैर नग असा एकूण एकंदर 4,08,255/- रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हे प्रकरणी डिमाजी पवार रा. चिंचवली व अनंता वाघमारे रा. पाले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.