लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क

शिहू : मंजुळा म्हात्रे

महाराष्ट्रासह बहुतांश जिल्ह्यात थैमान घालत असणाऱ्या लम्पी स्किन रोगाने रायगड जिल्ह्यात काही तालुक्यात शिरकाव केला असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिहू येथिल आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. लम्पी त्वचा रोग हा केवळ गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणुजन्य त्वचारोग आहे. याचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पशुधन धोक्यात आल्यामुळे पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

या रोगाने बाधित जनावरांच्या अंगावर १० ते २० मिलिमिटर व्यासाच्या गाठी येतात. भरपूर ताप येऊन नाका डोळ्यातून चिकट स्त्राव येते, अशावेळी वेळीच उपचार न केल्यास जनावर दगावू शकतो या साठी योग्य ती दक्षता घेन्याबाबत पशुसंवर्धन शिहू विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

लम्पी त्वचा रोग हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करून रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये या करिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.

 - डॉ. प्रशांत माळी, पशुवैद्यकीय डॉक्टर - शिहू

Popular posts from this blog