🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

साई प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य शिबीर संपन्न

साई/माणगांव : हरेश मोरे 

तालुक्यातील साई प्राथमिक आरोग्य केंद्रात 15 सप्टेंबर रोजी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. उपजिल्हा रुग्णालय माणगांव जिल्हा रायगड मार्फत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य विमा योजने अंतर्गत मोफत तपासणी व निदान करण्यासाठी शिबीर आयोजित केले होते.

या शिबिरात स्त्री रोग, अस्थिव्यंग, मूत्रपिंड व मूत्रमार्ग विकार, बालरोग, जठर व आतडे शस्त्रक्रिया यांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात 127 स्त्री व पुरुष तसेच लहान बालके यांची तपासणी करण्यात आली.

या शिबिरात डॉ. सुनीता कोकणे, डॉ. श्वेता भौड, डॉ. चैत्राली पवार, डॉ. वसुंधरा साकोलीकर यांनी तपासणी व निदान केले. तसेच अंकिता पोवार, कविता वाघमारे, मयुरी कासारे, अनिशा महाडिक, फातिमा कुरेशी, यालवा शेख, ऋतिका शिंदे, व्ही. व्ही. चव्हाण, जे. के. शिंदे व त्यांचे सहकारी सुद्धा उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog