संदीप कनघरे यांच्याकडून रा.जि.प. शाळा तामसोली येथे वह्या वाटप

कोलाड : निलेश महाडिक

तामसोली येथील रा.जि.प. शाळा तामसोली येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तसेच स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त 15 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी ११.०० वाजता इ. पहिली ते पाचवी व अंगणवाडीच्या मुलांना वह्या, पेन, भेटवस्तू वाटपाचे सामाजिक कार्य तामसोली गावातील समाजसेवक आदर्श युवक आणि सर्वांचे लाडके संजय कनघरे यांचे मोठे बंधू श्री संदीप लक्ष्मण कनघरे यांच्या हस्ते देण्यात आले. 

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डाकी सर तसेच गावातील पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठीत नागरिक आणि मित्रमंडळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog